Guru Margi November 2022: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांचं विशेष स्थान आहे. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी आणि स्वभाव वेगवेगळा आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. दुसरीकडे चंद्र (Chandra) आणि सूर्य (Surya) ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. गेल्या महिन्यात शनिदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. आता 24 नोव्हेंबरला गुरू ग्रह (Guru Grah Margi) मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. 24 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी मार्गस्थ होतील. गुरु ग्रहाला पुत्र, पत्नी, धन, शिक्षण आणि वैभवकारक ग्रह मानलं जातं. त्यामुळे या स्थितीचा काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम जाणवेल. पण चार राशी अशा आहेत की त्यांना या स्थितीचा फायदा होईल.
वृषभ- देवगुरू बृहस्पती या जातकांच्या अष्टम आणि एकादश भावाचे स्वामी आहेत. गुरु मार्गस्थ होणार असल्याने या राशीच्या लोकांना फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. सहकाऱ्यांकडून मदत होील आणि व्यवसायात उत्तम फायदा होईल. करिअरच्या दृष्टीने अनेक संधी मिळतील.
कर्क- गुरु या राशीच्या षष्ठम आणि नवम भावाचे स्वामी आहेत. यामुळे या राशीच्या लोकांना व्यापाऱ्यात लाभ होईल. हा काळ नवीन उद्योग सुरु करण्यासाठी उत्तम असेल. योग्य गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
कन्या- या राशीच्या चतुर्थ आणि सप्तम भावाचा स्वामी गुरु आहे. गुरु मार्गस्थ होणार असल्याने नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळेल. व्यवसायात देखील लाभ होईल. गुंतवणुकीत आपल्याला फायदा होऊ शकतो.
वृश्चिक- या राशीच्या द्वितीय आणि पंचम भावाचा स्वामी गुरु आहे. गुरुच्या मार्गक्रमणामुळे पगारात वाढ होईल आणि पदोन्नती मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळतील.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)