'या' 3 राशींच्या लोकांचे तब्बल 156 दिवस नशीब फळफळणार, गुरु देईल सुखासोबत धनदौलत !

Guru Gochar In Bharani Nakshatra : गुरु गोचर झाल्याने काही राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. त्यांचे नशीब उजळणार आहे. त्यांच्या भाग्योदय सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना धनदौलत मिळेल. शिबाय नशिबात सुखही आहे.

Updated: Jun 23, 2023, 10:01 AM IST
'या' 3 राशींच्या लोकांचे तब्बल 156 दिवस नशीब फळफळणार, गुरु देईल सुखासोबत धनदौलत ! title=
Guru Gochar In Bharani Nakshatra

Guru Gochar In Bharani Nakshatra : गुरु गोचर भरणी नक्षत्रामुळे काही राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार गुरु ग्रहाने भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे गुरुच्या नक्षत्र बदलामुळे सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहेत. देवगुरु बृहस्पती वर्षातून एकदा राशिचक्र बदलतात. 2023 मध्ये, गुरु ग्रहाने 22 एप्रिल रोजी आपली राशी बदलली आहे. 

गुरु सध्या मेष राशीत आहे आणि 1 मे 2024 पर्यंत मेष राशीत राहील. नुकतेच 21 जून 2023 रोजी नक्षत्र बदलून गुरुने भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. आता 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत बृहस्पति भरणी नक्षत्र सोडून अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. अशाप्रकारे 27 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 156 दिवस गुरु भरणी नक्षत्रात राहिल्यास सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येणार. दुसरीकडे, गुरुचे नक्षत्र बदल 3 राशीच्या लोकांसाठी भाग्य उजळण्यास मदत करणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना भरपूर पैसा मिळेल. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ते जाणून घ्या.

बृहस्पति नक्षत्र बदलाचा या राशींवर होणार मोठा परिणाम

मेष : 
मेष राशीच्या लोकांवर गुरुच्या नक्षत्र बदलाचा चांगला परिणाम होईल. गुरु नक्षत्र बदलल्याने मेष राशीत गुरु-राहूची युती तयार झालेला गुरु चांडाळ योग आता संपुष्टात आलाय. त्यामुळे जुन्या अडचणीही संपणार आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

मिथुन : 
गुरुच्या नक्षत्र बदलाचा मोठा परिणाम होत आहे. गुरुचे नक्षत्र बदल मिथुन राशीच्या लोकांना लाभ देईल. विशेषतः व्यापारी वर्गाला फायदा होईल. भरपूर पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. बचत करण्यात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संतानसुख मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा कार खरेदी करु शकता. नवीन लोकांच्या भेटीमुळे फायदा होईल. 

कर्क : 
रखडलेली कामे मार्गी लागतील. भरपूर पैसे मिळतील. तसेच गुरु राशीतील बदल कर्क राशीच्या लोकांना लाभ देईल. नवीन स्त्रोतांकडून पैसा मिळेल आणि उत्पन्नही वाढू शकेल. आरोग्य चांगले राहील. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची अधिक शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अतिशय शुभ आहे. तसेच तुमची रात्रंदिवस दुप्पट प्रगती होईल.  त्यामुळे आर्थिक सुबकत्ता येईल.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)