Gupt Navratri 2022: हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. यापैकी दोन नवरात्र गुप्त नवरात्री आणि दोन प्रत्यक्ष नवरात्री. गुप्त नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा देवीची गुप्त पद्धतीने पूजा करतात. तर चैत्र आणि शारदीय नवरात्री उत्साहात साजरी केली जाते. आषाढ महिन्यात महिन्यातील शुक्ल पक्षात म्हणजेच 30 जूनपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या गुप्त नवरात्री दरम्यान 10 देवींची पूजा केली जाते. कालीका, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, माता छिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, देवी ध्रुमावती, देवी बांगलामुखी, मातंगी आणि कमला देवींची पूजा केली जाते.
गुप्त नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील ही गुप्त नवरात्र 30 जून 2022 पासून सुरू होईल आणि 9 जुलै 2022 पर्यंत चालेल. आषाढ गुप्त नवरात्रीसाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 30 जून 2022 रोजी सकाळी 5:26 ते 6:43 मिनिटे असेल.
घटस्थापना व उपासना पद्धत
घटस्थापनेच्या दिवशी पसरट मातीच्या भांड्यात स्वच्छ माती ठेवावी आणि त्यात सप्तधान्य पेरावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलशाच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळा. कलशात कलावा बांधा आणि कलशाच्या वर आंबा किंवा अशोकाची पाने ठेवा. नंतर नारळ लाल कपड्यात गुंडाळून कलशावर पानांच्या मध्यभागी ठेवा. नारळावरही कलावा बांधावा. त्यानंतर देवीचे आवाहन करावे. कुंकू, अक्षत, फुले, सुपारी इत्यादी अर्पण करा. धूप-दीप लावून कलश आणि देवी दुर्गेची आरती करा. तुपाची अखंड ज्योत लावणे देखील खूप शुभ आहे. गुप्त नवरात्रीत 9 दिवस सकाळी आणि संध्याकाळी घटाची पूजा करा. देवीला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा आणि यावेळी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)