मुंबई : हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते. गणरायाचं आगमन होतं. अनेकांच्या घरी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा विराजमान असतो. तर काहींच्या घरी गौरी - गणपती विसर्जनापर्यंत बाप्पा असतो. यंदा गणरायाचं आगमन आज म्हणजे 10 सप्टेंबर रोजी होत आहे. 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान गणरायाचा जन्म झाला. जाणून घेऊया गणरायाची पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त
या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी.
यानंतर शाडूच्या गणरायाच्या मूर्तीचे आगमन करावे.
कलशामध्ये जल भरा. त्यानंतर त्याचे मुख वस्त्राने बांधा. यानंतर गणरायाची स्थापना करावी.
गणरायाला सिंदूर, दुर्वा, तूप आणि 21 मोदकाचा प्रसाद करावा यानंत विधीव्रत पूजा करावी.
गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर प्रसादाचा वाटप करावे
दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा करावी. अनेकांच्या घरी गणरायाची मूर्ती दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवावे.
सकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: सकाळी 09:10 ते दुपारी 01:56 वाजेपर्यंत
दुपारी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: दुपारी 3.32 ते सायंकाळी 5.07 वाजेपर्यंत
संध्याकाळी गणेश विसर्जनाचा मुहूर्त: संध्याकाळी 8.20 ते 9.32 वाजेपर्यंत
रात्री गणेश विसर्जनाचा मुहूर्त: रात्री 10.56 ते पहाटे 03:10 वाजेपर्यंत
अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर गणेश मूर्तीची पूजा करावी.
त्यानंतर गणेशाच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
गणेश मंत्र आणि गणपतीची आरती करावी.
पूजा करण्यापूर्वी गणपतीसमोर स्वस्तिक काढून त्याची पूजा करावी.
गणपती बाप्पाचे विसर्जन करताना त्याचे पूर्ण आदर आणि भक्तिमय वातावरणात त्याचे विसर्जन होईल याची काळजी घ्यावी.