Five Planet Alignment : अवकाशात 5 ग्रहांचं अद्भूत मिलन, 'या' राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली

5 Planets Conjunction In Sky : आकाशात गुरू, बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनसचे अद्भुत दृश्य दिसेल. या दरम्यान, ग्रहांची अशी स्थिती तयार होईल, ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. 

Updated: Mar 28, 2023, 04:41 PM IST
Five Planet Alignment : अवकाशात 5 ग्रहांचं अद्भूत मिलन, 'या' राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली title=
Five Planets Parade Zodiac signs Effect in marathi Horoscope 28 March 2023 get money astrology in marathi

Five Planets Parade Zodiac signs Effect in marathi : अवकाशात संध्याकाळी 5 ग्रहांचं अद्भूत मिलन पाहिला मिळणार आहे. गुरू, बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनस एकत्र दिसणार आहे. दुर्मिळ योगामुळे काही राशींचं भवितव्य उजळणार आहे. चला जाणून घेऊयात या ग्रह गोचरमुळे 12 राशींवर काय परिणाम दिसून येणार आहे ते...(Five Planets Parade Zodiac signs Effect in marathi Horoscope 28 March 2023 get money astrology in marathi)

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हे ग्रह गोचर शुभ आहे. रंग - पिवळा आणि उपाय - वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक अडचण येण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी खर्च होईल. हिरवा रंग शुभ असणार आहे. उपाय - गणपतीची पूजा करा. 

मिथुन (Gemini)

नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायात काळजी घ्या. रंग - हिरवा रंग शुभ उपाय - हनुमानजीची पूजा करा. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. शुभ रंग - लाल 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी धनलाभ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. शुभ रंग - केशरी 

कन्या (Virgo)

या राशीची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणी येणार आहेत. शुभ रंग - निळा उपाय- गणेशाची पूजा करा. 

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांनी पैसे जपून वापरा. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पिवळा उपाय हनुमान चालिसाचं पाठ करा. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. शुभ रंग - केशरी  उपाय - गाईला गूळ खाऊ घाला. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना यश मिळणार आहे. शुभ रंग - पिवळा उपाय - मंदिरात दान करा. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. शुभ रंग - निळा उपाय - गाईला पालक खायला द्या 

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - आकाशी उपाय - अन्नदान करा. 

मीन (Pisces)

नोकरीच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा उपाय - धार्मिक ग्रंथ दान करा. सूर्य आणि गुरुच्या बीज मंत्राचा जप करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)