Tulsi Plant : घरात 'या' ठिकाणी तुळशीचं रोप ठेवू नका, अन्यथा...!

दररोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. 

Updated: Jul 27, 2022, 09:11 AM IST
Tulsi Plant : घरात 'या' ठिकाणी तुळशीचं रोप ठेवू नका, अन्यथा...! title=

मुंबई : तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक घरात लावलं जातं. त्याचशिवाय हिंदू धर्मात तुळशीची पूजा फार महत्वाची मानली जाते. असं मानलं जातं की, तुळशीमध्ये भगवान विष्णू वास करतात आणि दररोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. 

प्रत्येक व्रत आणि धार्मिक विधींमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. यावरून तुम्ही तुळशीच्या रोपाच्या महत्त्वाचा अंदाज लावू शकता. तुळशीचं रोप योग्य दिशेने लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते मात्र जर ते चुकीच्या दिशेने लावली तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणू शकते.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं रोप घरामध्ये कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभ ऐवजी अशुभ फळ देतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरात तुळशीचे रोप कोणत्या ठिकाणी ठेवू नये.

  • वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप विसरुनही गच्चीवर ठेवू नये. ज्या लोकांचा बुध ग्रह पैशाशी संबंधित आहे, त्यांनी याची विशेष काळजी घ्यावी. तुळशीचे रोप टेरेसवर ठेवल्याने आर्थिक नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे.
  • तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला ठेवू नये. या रोपासाठी उत्तर ते ईशान्येकडे हे एक शुभ स्थान मानलं जातं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुळशीचे रोप पश्चिम दिशेलाही ठेवू शकता.
  • तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष अधिक होतात. त्यामुळे विसरुनही ही रोप इथे ठेवू नका.
  • लक्षात ठेवा की, तुळशीच्या रोपावर पक्षी किंवा कबुतरांनी घरटी बांधू नयेत, असं झाल्यास घरातील केतू अशुभ होण्याचं लक्षण आहे.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)