दिवाळीत या ७ गोष्टी आर्वजून टाळा

दिवाळीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात तशाच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे देखील काही नियम आहेत.

Updated: Oct 12, 2017, 03:01 PM IST
दिवाळीत या ७ गोष्टी आर्वजून टाळा title=

मुंबई : दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळी तयारी करतो. घरी रंगकाम करतो, साफसफाई करतो, नवनवीन वस्तू विकत घेतो. दिवाळीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात तशाच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे देखील काही नियम आहेत. काय गोष्टी वर्ज्य कराव्यात आणि त्या कुणी कराव्यात.

घर स्वच्छ ठेवा

दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात घाण, कचरा, धूळ जमा होऊ देऊ नये. घरातील कोपरा न कोपरा एकदम स्वच्छ करावा. कोणत्याही प्रकारची दुर्गंधी न ठेवता. घरात रंगकाम करावं. तसेच सुगंधी द्रव्यांचा वापर करावा. 

क्रोध, वाद करू नये

दिवाळीच्या दिवसांमध्ये क्रोध तसेच चिडचिड करणे चांगले नसते. जे लोक या दिवसांमध्ये चिडचिड करतात त्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. घरामध्ये शांत, आनंदाचे आणि पवित्र वातावरण ठेवावे.

सकाळी उशिरापर्यंत झोपू नये

अनेकजण सकाळी उशिरापर्यंत झोपणे पसंत करतात. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठावे. शास्त्रानुसार दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वांना ब्रम्ह मुहूर्तावर झोपेतून उठणे महत्वाचे आहे. जे लोक या दिवशी सूर्याोदयानंतरही झोपून राहतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. या दिवसांमध्ये सकाळी लवकर उठावे.

वडीलधाऱ्या मंडळीचा आदर करा

दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये अधार्मिक कार्य घडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. आई वडिल आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करावा. आई वडिलांचा अनादर करून कधीच आनंद होत नाही. कारण आई वडिल हेच पहिले देव आहेत. सर्वांशी आनंदाने प्रेमाने वागावे.

सूर्यास्ताच्या वेळी झोपू नये

काही विशेष परिस्थितींना सोडून दिवस आणि संध्याकाळी झोपू नये. जर एखादा व्यक्ती आजारी किंवा वृद्ध आणि गरोदर स्त्रियांसाठी हे अपवाद आहे. मात्र हेल्थी व्यक्तीने झोपू नये. या वेळेला झोपू नये. 

भांडण करू नये

या दिवसांमध्ये कोणासोबतही भांडण करू नका तसेच घरामध्ये कलह निर्माण होईल असे वागू नका. घरातील सर्व सदस्यांनी आनंदी मनाने हा सण साजरा करावा. ज्या घरामध्ये वाद, कलह असतो त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही.

दारू पिऊ नका

दिवाळी हा सण आनंदाचा आणि ऐश्वर्याचा दिवस.  त्यामुळे या दिवशी दारू पिऊ नये तशीच कोणतीही नशी करू नका.  नशा  केल्याने घरातील पवित्रता नष्ट, शांती भंग होते. यामुळे घरात वाद-कलह निर्माण होतात आणि धार्मिक कर्म योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाहीत.