Dhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी

Dhantrayodashi 2022 Rangoli :  दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील. 

Updated: Oct 22, 2022, 12:53 PM IST
Dhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी  title=
Dhantrayodashi 2022 Simple Rangoli Designs Video nmp

धनत्रयोदशी 2022 रांगोळी :  दिवाळी (Diwali 2022) जसा दिव्यांचा सण तसा तो रांगोळीचा (Rangoli) देखील सण आहे. भारतात आजही गावांमध्ये घरासमोर रोज रांगोळी काढण्याची परंपरा आहे. अनेकांना सुंदर अशी रांगोळी काढायला येतं. अगदी स्त्री कशाला आज पुरुषीही अगदी सुंदर रांगोळी काढतात.  ठिपक्याची रांगोळी, संस्कार भारती असे रांगोळीचे प्रकार...  पण अनेक जणी अशा आहेत ज्यांना रांगोळी काढता येतं नाही. पण दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी (Simple Rangoli Designs) दाखविणार आहोत. हे व्हिडीओ (Video) तुमची दिवाळी अजून सुंदर करतील. (Dhantrayodashi 2022 Simple Rangoli Designs Video nmp)

आजकाल बाजारात रांगोळी बनवण्यासाठी अनेक साहित्य मिळतात. त्यामुळे महिलांना आणि तरुणांना या साहित्यांचा वापर करुन सोप्या पद्धतीने (easy rangoli) रांगोळी काढू शकतात. 

 

 

तुम्हाला माहिती आहे आपल्या घरातील पेन आणि पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही सुरेख रांगोळी काढू शकतात. पाहा कशी 

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि दुसरा दिवस धनत्रयोदशी...अनेक जण या दिवसांप्रमाणे रांगोळी काढतात. म्हणून आम्ही पण तुम्हाला आजच्या दिवसासाठी हे खास रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत. 

या सुरेख आणि सुंदर रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवतील हे नक्की.

दिवाळी तसंच अन्य मंगल प्रसंगी रांगोळी शिकण्याचे क्लास आता अनेक शहरांमध्ये आहेत. त्याचबरोबर पुस्तकं, सोशल मीडिया या माध्यमातूनही रांगोळी काढण्याच्या टिप्स दिल्या जातात. चला तर मग छान रांगोळी काढा आणि दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करा.