Dhanteras 2022 Gold Silver Shopping : हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोकं सोनं खरेदी करतात. या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते. यंदा 23 ते 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केली जाते. घरात धन, सुख-समृद्धी येते. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची देखील पूजा केली जाते.
धनत्रयोदशीला सोने- चांदीचे नाणे, दागिने किंवा इतर वस्तू खरेदी केले जाते. कारण ते शुभ मानलं जातं. असं केल्याने लक्ष्मी आणि भगवान कुबेरचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करावे. यासाठी 23 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून ते 6 वाजून 5 मिनिटापर्यंत 21 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे.
धनतेरसच्या दिवशी सोने-चांदी खरेदी केले जाते. यासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे सकाळी 6 वाजून 31 मिनिटांपासून ते दुपारी 2 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. यावेळी सोनं-चांदी खरेदी केल्यास भरभराट होते.