Vish Yog In Kundli: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीबदल करतो. यावेळी ग्रहांच्या संयोगाने शुभ आणि अशुभ योग तयार करतात. या शुभ आणि अशुभ योगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. असाच एक विनाशकारी योग तयार झाला आहे.
शनी आणि चंद्राच्या संयोगामुळे विषयोग तयार झाला आहे. 27 सप्टेंबरच्या संध्याकाळी हा संयोग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये, हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. त्यामुळे शनी आणि चंद्राचं हे संयोजन काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरणार आहे. जाणून घेऊया विष योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा नकारात्मक परिणाम भोगावा लागणार आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी शनी आणि चंद्राची युती हानिकारक ठरू शकते. एकीकडे शनीची सावली तुमच्यावर असून हा संयोग तुमच्या राशीतून आठव्या घरात तयार झाला आहे. यावेळी तुमची प्रकृती बिघडू शकते. मोठा व्यवहार करू नका. ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी बेफिकीर राहू नका. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही स्किममध्ये पैसे गुंतवू नका.
कन्या राशीच्या लोकांसाठी शनी आणि चंद्राचा संयोग हानिकारक ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या राशीपासून सहाव्या घरात तयार झाला आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा शेजारच्या ठिकाणी कोणीतरी कट रचू शकतात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात प्रवास करू नये. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जोडीदाराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
शनी आणि चंद्राचा संयोग तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकणार आहे. हा संयोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या 12 व्या घरात तयार झाला आहे. यावेळी तुमच्यावर काही खोटे आरोप केले जाऊ शकतात. कुटुंबामध्ये विनाकारण वाद होऊ शकतात. यावेळी नवीन काम करणं टाळावं. तुम्हाला आर्थिक काळजी घ्यावी लागेल. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )