Horoscope 17 August : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका!

जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य.

Updated: Aug 17, 2022, 07:09 AM IST
Horoscope 17 August : 'या' राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका! title=

मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, याची माहिती घेऊया. जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य...

मेष

तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे पार पाडा. आजच्या दिवशी गरजू मित्राला मदत करा, दुपारची वेळ चांगली आहे.

वृषभ

आजच्या दिवशी सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करा. तसंच आर्थिक स्थिती अनुकूल राहील. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन

आजच्या दिवशी दुपारपर्यंत समस्या सुटतील. त्याचप्रमाणे घाईघाईत कोणताही निष्काळजीपणा करू नका. मोठ्यांचा आदर करा.

कर्क

आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका. तसंच घरात पाहुणे येण्याचा योग आहे. त्याचशिवाय तुमचा निर्णय काळजीपूर्वक घ्या.

सिंह

आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीवर वाद घालत बसू नका. व्यवसायामध्ये मोठा नफा मिळणार आहे. आज इतरांकजून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

नातेससंबंधात कडवटपणा येण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत जागत बसू नका. तुमची स्वाक्षरीचा विचारपूर्वक करा.

तूळ

आजच्या दिवशी एखाद्या स्त्रीकडून मदत मिळेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. मोठ्यांचा आदर करा.

वृश्चिक

आजच्या दिवशी नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. घराची पूर्व बाजू स्वच्छ ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनु

आजच्या दिवशी तुम्ही घेत असलेल्या आहाराची काळजी घ्यावी. करियरमध्ये कोणतेही बदल करू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

मकर

आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा. वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवा.

कुंभ

आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. तसंच आज कोणाशीही वाद घालू नका. तुमचं गुपित कोणाशी शेअर करू नका.

मीन

वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. गोड फळ दान करा. कोणालाही वाईट सल्ला देऊ नका.