Horoscope 04 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कौटुंबिक व्यवसायात तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने तुमचा आर्थिक नफा वाढेल. राजकारणात तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी अचानक आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या कृतींबाबत सावध राहावं.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. भावंडांशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळा.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कुटुंबात आनंदी वातावरण तयार होईल. नवीन व्यवहार व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. आजचा दिवस खूप चांगला जाईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी व्यवसायात नवीन काही करण्यापासून सावध राहा. अपेक्षेप्रमाणे प्रगती न झाल्याने निराशा होऊ शकते.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मालमत्तेशी संबंधित प्रकरणं निकाली लागतील. व्यवसायासंदर्भात कामाला अधिक महत्त्व द्या.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी आपले लक्ष गुंतवणुकीशी संबंधित कामात ठेवा. नोकरीत अधिकार वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुमच्या जुन्या मित्राशी संवाद होईल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. मित्र तुम्हाला आर्थिक मदत करण्यास मदत करतील. आज तुम्ही नवीन वस्तू खरेदी करु शकता.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी चांगले फळ मिळेल. व्यवसायासाठी चांगली स्थिती असणार आहे. आपल्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी नोकरीच्या क्षेत्रात तुमच्याबरोबर सर्व काही चांगले होईल. जुन्या गुंतवणूकदारांमुळे व्यावसायिक वर्गाला फायदा मिळू शकेल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडू शकतं.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )