Horoscope 03 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी तुम्ही नोकरी आणि कुटुंब यांच्यात समतोल राखू शकणार आहात. नातेवाईकासोबत सुरू असलेले गैरसमजही दूर होतील.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी आर्थिक स्थितीत काही प्रकारचे चढ-उतार होऊ शकतात. भावनेने कोणताही निर्णय घेऊ नका.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी कौटुंबिक सदस्याच्या वैवाहिक जीवनात चालू असलेल्या समस्यांबद्दल चिंता राहणार आहे. कामाच्या दबावामुळे कुठेतरी अडकल्यासारखे वाटू शकते.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी करिअर आणि क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. काही नवीन कामांचे नियोजन करता येईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा होऊ शकते. पैशाचे कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्या.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी पूर्वीची कोणतीही रखडलेली योजना पुन्हा सुरू होऊ शकते. गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण काळजी घ्या.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींचं जवळच्या नातेवाईकाशी काही सामान्य बाबीवरून वाद होऊ शकतो. काही विरोधक तुमच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवू शकतात.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने अनेक अडचणींवर मात करता येईल. पती-पत्नीने एकमेकांशी सुसंवाद ठेवला तर दिवस चांगला जाईल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी तुम्हाला विविध क्षेत्रात आज अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील. महत्वाच्या काही कामाबद्दल तुम्ही मित्रांशी बोलू शकता.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी सावधगिरीने कामे करावीत. काही महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करत असाल तर नंतर तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला मालमत्तेचा वाद संपुष्टात येईल. कामाच्या ठिकाणी आपले कार्य कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कोणताही निर्णय घेताना त्याचा नफा-तोटा विचारात घ्या. व्यवसायात आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )