Horoscope 21 october 2022 : सूर्यासारखं तळपणार तुमचं नशीब; पाहा मेषपासून मीन राशीपर्यंतचं आजचं भविष्य

आज, वसुबारसच्या (Vasubaras 2022) दिवशी पाहा कोणाचं नशीब फळफळणार... भरभराट होणाऱ्या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का...  

Updated: Oct 21, 2022, 07:44 AM IST
Horoscope 21 october 2022 : सूर्यासारखं तळपणार तुमचं नशीब; पाहा मेषपासून मीन राशीपर्यंतचं आजचं भविष्य  title=
Daily Horoscope today 21 october 2022

Horoscope 21 october 2022 : (Diwali 2022) दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. आज वसुबारस, अर्थात खऱ्या अर्थानं दिवाळीची सुरुवात. याच दिवशी अनेक राशींचं नशीब फळफळणार आहे. पाहा यात तुमची रास आहे का... 

मेष (Aries Horoscope Today)
शैक्षणित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांची प्रगती होणार आहे. आज आईचे सर्व आशीर्वाद फळणार आहेत. आजच्या दिवशी इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त करा. दिवस प्रसन्न असेल.

वृषभ (Today Taurus Horoscope)
आजच्या दिवशी आत्मसंयम महत्त्वाचा. नोकरीमध्ये प्रगती करण्याचा योग आहे. वरिष्ठ तुमच्या कामानं प्रभावित असणार आहेत. एखाद्या ठिकाणहून मोठ्या हुद्याच्या नोकरीसाठी विचारणा होणार आहे. 

मिथुन (Today Gemini Horoscope)
मन काहीसं अशांत असेल. पण, काही व्यक्तींच्या भेटीनं तो प्रश्नही सुटणार आहे. आजचा दिवस भरभराटीचा आहे. अनपेक्षित गोष्टी आयुष्याला कलाटणी देणार आहेत. 

कर्क (Cancer Horoscope Today)
वाणी गोड ठेवा. इतरांशी वाद घालू नका. मन प्रसन्न ठेवा. आज एखादं असं काम तुमच्याकडून घडणार आहे, ज्याची वाहवा सर्वदूर पसरेल.

सिंह (Leo Horoscope Today)
अडकलेली कामं मार्गी लागण्यापासून ते अगदी नोकरीमध्ये प्रगतीपथावर जाईपर्यंतच्या सर्व संधी तुम्हाला मिळणार आहेत. एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल. 

कन्या (Horoscope Virgo Today)
आज उत्साही स्वभावाचा फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. व्यवसायामध्ये वाढ होईल. आज कुटुंबीयांची साथ मिळेल. 

तुळ (Libra Horoscope Today)
प्रवासयोग आहे. अनपेक्षितपणे एखादा सुरेख प्रवास घडणार आहे. जो तुमच्या आयुष्यालाच कलाटणी देईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज वारेमाप खर्च कराल. पण, अर्थार्जनाच्या नव्या वाटाही गवसणार आहेत. आज लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. 

धनु (Sagittarius Horoscope Today)
धीरानं काम करा. आज तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. मन प्रसन्न ठेवा. आज विवाहोत्सुकांसाठी मनाजोगं स्थळ येणार आहे. 

मकर (Today Capricorn Horoscope)
नकारात्मक विचार दूर ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. एखाद्या शुभकार्यात सहभागी होण्याची संधी आहे. जोडीदार पावलोपावली साध देणार आहे. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)
आरोग्याची काळजी मिटेल. आज प्रत्येक कामात यश मिळणार आहे. सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. 

मीन (Pisces Horoscope Today)
आज तुमच्या आत्मविश्वासाची प्रशंसा होईल. कौटुंबीक समस्या मिटतील. खर्च वाढतील पण, सणासुदीच्या दिवसाच धनलाभाचाही योग आहे.