आजचे राशीभविष्य | रविवार | ३० जून २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Jun 30, 2019, 09:32 AM IST
आजचे राशीभविष्य | रविवार | ३० जून २०१९  title=

मेष- काही नवे अनुभव मिळतील. विविध प्रकारच्या अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या मनातील काही गोष्टी अगदी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीकडून आज काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करा. कौटुंबीक नाती सुधारण्याचे प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्या. आज तुम्ही उत्साही असाल. मनमोकळेपणाने कामं करा. भावंड आणि मित्रपरिवाराची मदत मिळेल. 

वृषभ- तुमच्यासाठी वेळ चांगला आहे. प्रत्येक प्रकारच्या आव्हानासाठी तयार असाल. नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीला मोलाटा सल्ला द्याल. सहकारी, भावंड आणि मित्रपरिवाराची मदत मिळेल. 

मिथुन- आज तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा. अर्थार्जनाचे चांगले प्रस्ताव मिळतील. याचा गांभीर्याने विचार करा. इतरांच्या कामावर लक्ष ठेवाल. करिअर, संपर्क आणि स्वत:च्या प्रतिमेसाठी दिवस चांगला आहे. विविध स्पर्धांमध्ये यश मिळेल. 

कर्क- इतरांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिवस चांगला आहे. करिअरच्या चांगल्या संधी मिळतील. जबाबदारीची कामं पूर्ण करण्यावर भर द्या. अचानल धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वातावरण चांगलं असेल. व्यापारात प्रगतीचा योग आहे. 

सिंह- इतरांना मागे टाकत स्वत: पुढे जाण्याकडे तुमचा कल असेल. कितीही व्यग्र असाल तरीही कुटुंबाला प्राधान्य द्या. काही महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगतीची वाटचाल कराल. अर्थार्जनाची संधी मिळेल. शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

कन्या- तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे. पैशांशी संबंधित इतर अडचणी दूर होतील. कोणा एका खास व्यक्तीचा सल्ला मिळेल. जमीन- संपत्तीचा फायदा होईल. 

तुळ- कोणा एका कामासाठी अतिशय उत्साही असाल. नवे अनुभव मिळतील. ज्यामुळे करिअरमध्ये मदत होईल. बऱ्याच दिवसांपासून विचाराधीन असणारी कामं पूर्ण कराल. धार्मिक कामांमध्ये रुची वाढेल. 

वृश्चिक- अनेक गोष्टींचा अंदाज घेण्यात तुम्हाला इतरांची मदत मिळेल. नवी माहिती मिळेल. तुमच्यापासून अतर प्रभावित होतील. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. योग्य वेळी योग्य ठिकाणी असाल. या संधीचा फायदा घ्या. 

धनू- अनेक गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्हाला मदत होईल. नवी माहिती मिळेल. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल. आत्मविश्वास जास्त असेल. वेळ तुमचीच आहे. संधीचा योग्य फायदा घ्या. 

मकर- संधी मिळाल्यास आराम करा. कोणा एका नव्या योजनेवर काम करत असाल तर त्यामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. साथीदारासाठी एखादी लहानशी भेट खरेदी करा. व्यापारात यश मिळेल. 

कुंभ- कायदेशीर प्रकरणात एखादी चांगली बातमी मिळेल. मित्रांमसोबत कामाचे बेत आखाल. इतरांशी चांगला मेळ साधाल. जुन्या गुंतवणूकीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. वरिष्ठ आणि मोठी मंडळी तुमच्या कामाने प्रभावित आणि आनंदित असतील. 

मीन- तुमची मतं स्पष्टपणे मांडा. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. प्रयत्न कराल तर, कोणा एका खास व्यक्तीवर प्रभाव पा़डण्य़ात यशस्वी ठराल. अचान झालेल्या ओळखीचं रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल.