Horoscope 5 January 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ आणि मालामाल होण्याची संधी

Horoscope 5 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहूनच घ्या आजचं राशीभविष्य. तुमच्या राशीत आहे असा योग जो करेल मोठी मदत....   

Updated: Jan 5, 2023, 06:23 AM IST
Horoscope 5 January 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ आणि मालामाल होण्याची संधी   title=
daily Horoscope 5 January 2023 wednesday

Horoscope 5 January 2023 : चला पाहूया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल.... 

मेष (Today Aries Horoscope)
आर्थिक स्थिती सुधारेल. अभ्यासामध्ये आज तुमचं मन रमणार आहे. एखादा नवा दागिना खरेदी कराल. 

वृषभ (Today Taurus Horoscope)
दाम्पत्य जीवनामध्ये सुखावह प्रसंग अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तांदूळ दान करा. आज नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today)
गरजवंतांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. तुमच्या याच स्वभावामुळं समाजात मिळणारी प्रतिष्ठा वाढणार आहे. 

कर्क (Cancer Horoscope Today)
आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही कामात संकोच बाळगू नका. मित्रांची मदत करण्यासाठी पुढाकार घ्या. हेच मित्र तुमच्या भाग्योदयास निमित्त ठरतील. 

सिंह (Leo Rashifal Today)
रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कोणाकडूनही पैसे उधार घेू नका. आज आर्थिक व्यवहार जरा जपून करा. 

कन्या (Horoscope Virgo Today)
विद्यार्थीदशेत असाल, तर अभ्यासावर लक्ष द्या. एखाद्या नव्या संधीवर लक्ष ठेवा आज तुम्हालाच फायदा होणार आहे. 

तुला (Libra Horoscope Today)
कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ मोठ्या विश्वासानं तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार आहेत. चोखपणे काम करा. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज एखाद्या कामात नुकसान होऊ शकतं. तरीही विश्वास ठेवा. परिस्थिती सुधारणार आहे. संयम ठेवा. 

धनु (Sagittarius Horoscope Today)
आज मित्रांना भेटण्याची संधी आहे. कोणा एके ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. आजचा दिवस तुमचाच आहे. 

मकर (Today Capricorn Rashifal)
आजचा दिवस शुभ आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. 

कुंभ (Today Aquarius Horoscope)
आजचा दिवस काहीसा धावपळीचा असेल. आर्थिक लाभ होणार आहे. नोकरीच्या नव्या संधी मिळणार आहेत. 

मीन (Pisces Rashifal Today)
आज एखादा दागिना महिला वर्गाला मिळू शकतो. हा दिवस खूप खास आहे. भरभराटीचा आहे. 

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )