Horoscope 4 January 2023 : आज बुधवार. पाहा आजच्या दिवसाचं तुमचं राशीभविष्य काय आहे....
मेष (Aries Horoscope Today)
कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. वेळीच कुटुंबीयांची मदत घ्या. कोणालाही आज पैसे उधार देऊ नका.
वृषभ (Today Taurus Horoscope)
गुरुंचा आदर करा. कोणत्याही कामामध्ये बेजबाबदारपणे वागू नका. संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
मिथुन (Today Gemini Horoscope)
अडकलेली कामं आज मार्गी लागणार आहेत. कर्जाऊ दिलेले पैसे परत मिळणार आहेत. आज उगवत्या सूर्याचं दर्शन घ्या.
कर्क (Cancer Horoscope Today)
तुमच्या वाटेतील सर्व अडचणी दूर होणार आहेत. सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. चुकीचे निर्णय घेऊ नका.
सिंह (Leo Rashifal Today)
जुन्या मित्रांची मदत तुम्हाला मिळणार आहे. पाहुणे घरी येणार आहेत. त्यांच्यातील एक व्यक्ती तुमच्या भाग्योदयाचं कारण ठरणार आहे.
कन्या (Horoscope Virgo Today)
कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
तुला (Libra Horoscope Today)
दुपारच्या वेळी बाहेर घडणाऱ्या सर्व गोष्टींवर लक्ष द्या. तुमच्यावर सोपवलेलं काम कोणा दुसऱ्याच्या हाती देऊ नका.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
विचारपूर्वक निर्णय घ्या. आज सर्व ग्रहांची दशा तुम्हाला पूरक अशीच आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
स्वत:ला चांगलं सिद्ध करण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आज एखादी वस्तू दान करा.
मकर (Today Capricorn Rashifal)
नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा व्याप वाढणार आहे. आज दुर्गा कवचाचं पठण करा.
कुंभ (Today Aquarius Horoscope)
आज मनाजोगं स्थानपरिवर्तन होणार आहे. मित्रांसमवेत एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखाल. मारुतीची पूजा करा.
मीन (Pisces Rashifal Today)
आजचा दिवस काहीसा आळसावलेला असेल. दुपारच्या वेळी बाहेर जाण्याचा बेत आखाल. नारायण कवचाचं पठण करा.