Horoscope 23 August : दिवसाची सुरुवात झालीये, त्यामुळं तुमच्या राशीत आज नेमके कोणकोणते योग आहेत ते एकदा पाहाच...
मेष- नवं घर खरेदी करण्याचा योग आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. आर्थिक नियोजनाचा फायदा होणार आहे.
वृषभ- नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा योग आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. इतरांची मनं ओळखायला शिका.
मिथुन- मनात असणाऱ्या सर्व चिंता मिटणार आहेत. अभ्यासावर लक्ष द्या. खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा.
कर्क- गृहकलह संपणार आहे. व्यापारात भरभराट होणार आहे. जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे.
सिंह- कर्जानं घेतलेले पैसे फेडण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील अडचणी दूर होणार आहेत.
कन्या- मोठ्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. नवं वाहन खरेदी कराल. नातेसंबंध सुधारणार आहेत.
तुळ- वाहन भेट स्वरुपात मिळू शकतं. विचारपूर्वक गुंतवणूक करा. नव्या कामांचा फायदा तुम्हाला होणार आहे.
वृश्चिक- नात्यांमध्ये सावध राहा. व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणाशीही वाद घालू नका.
धनु- मोठ्याच्या आशिर्वादानं पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. घर स्वच्छ ठेवा. सकारात्मकता नांदेल.
मकर - नोकरीमध्ये बदल करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. कर्जाऊ पैसे परत मिळणार आहेत.
कुंभ - सायंकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळणार आहे. महत्त्वात्या वस्तू सांभाळा. मित्रांची साथ मिळणार आहे.
मीन- दुपारपर्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करा. अचानक एखादी दुखापत होऊ शकते. काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा.