Ganesh Visarjan 2022 Vidhi: 09 सप्टेबंर 2022 शुक्रवारी गणेश महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच अंनत चर्तुदशी आहे. देशात 9 संप्टेबरला शुभ मुहूर्तावर बाप्पांचे विसर्जन केले जाईल. बाप्पांचे विसर्जन करताना धार्मिक विधी आणि पूजा केली जाते आणि सोबतच या मंत्राचा जप केला जातो.
Ganesh Visarjan Mantra 2022: अंनत चतुर्दशीला 10 दिवसीय बाप्पांचे विसर्जन केले जाते. या दिवशी गणेश पूजा सोबतच विष्णूच्या अंनत रुपांची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनंत चतुर्दशी हा उत्सव साजरा केला जातो आणि याच दिवशी 10 दिवसीय बाप्पांचे विसर्जन केले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार बाप्पाचे विसर्जन करण्याआधी विधी, पूजा - अर्चना आणि गणेश उपासना केली जाते. असे मानले जाते की बाप्पांचे विसर्जन करताना मंत्र जप केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर आयुष्यभर सुखी, समृद्धी आणि आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद देतात. चला जाणून घेऊया बाप्पांचे विसर्जन करताना कोणत्या मंत्राचा जप केला जातो.
ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
हिंदू पंचांगांनुसार 10 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्दशी तिथीला केले जाते. या वर्षी चतुर्दशी तिथि, गुरुवार 08 सप्टेबंर 2022 सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि 9 सप्टेबंर 2022 सायंकाळी 01 वाजून 30 मिनिटांनी समाप्त होईल.
तिथिअनुसार चतुर्दशी तिथि 9 सप्टेबंर साजरी करता येईल. या वर्षी गणेश विसर्जनला तीन शुभ मुहूर्त सांगितले जात आहेत.
बाप्पांच्या विसर्जनकरिता सकाळचा मुहूर्त- सकाळी 06 वाजून 03 मिनिटांनी ते 10 वाजून 44 मिनिटांपर्यंत.
बाप्पांच्या विसर्जनकरिता दुपारचा मुहूर्त- दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी ते 01 वाजून 52 मिनिटांपर्यंत.
बाप्पांच्या विसर्जनकरिता सायंकाळचा मुहूर्त- सायंकाळी 05 ते 06 वाजून 31 मिनिटांपर्यंतची वेळ शुभ आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)