वर्षातील दुसरे चंद्रग्रहण या तारखेला, जाणून घ्या वेळ आणि भारतात काय होणार परिणाम?

Chandra Grahan 2023 : पुन्हा एकदा चंद्रग्रहणाचा योग आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी झाले. आता वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बाकी आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्याचाही मोठा परिणाम होणार आहे. 

Updated: May 19, 2023, 11:44 AM IST
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण या तारखेला, जाणून घ्या वेळ आणि भारतात काय होणार परिणाम? title=

Chandra Grahan 2023 Date Time in India : वर्षातील पहिले चंद्रग्रहन 5 मे 2023 रोजी झाले. मात्र, ते भारतात दिसलेले नाही. आता या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. (Chandra Grahan ) हे ग्रहण भारतात दिसणार असून त्याचे काही परिणाम होणार आहे.  वर्ष 2023 मध्ये 4 ग्रहण होणार आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण आहेत. आतापर्यंत एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण झाले आहे. 

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले तर चंद्रग्रहण 5 मे, शुक्रवारी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले. आता पुढील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची वेळ आहे. आत्तापर्यंत झालेली दोन ग्रहणे भारतात दिसलेली नाहीत, त्यामुळे त्यांचा सुतक काळही विचारात घेतला गेला नाही. मात्र आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे ते भारतातही दिसणार आहे आणि त्याचा परिणामही होणार आहे. 

 दुसरे चंद्रग्रहण कधी आणि त्याचा कालवधी किती? 

2023 या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण रविवार 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण खूप खास असेल. कारण संपूर्ण वर्षभर भारतात दिसणार्‍या सर्व ग्रहणांपैकी हे एकमेव ग्रहण असेल. हे ग्रहण देशात दिसणार असल्याने या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधीही वैध असणार आहे. हे शेवटचे चंद्रग्रहण भारतात 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 01:06 वाजता सुरु होईल आणि 02:22 वाजता समाप्त होईल. भारतातील या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे असेल.

 चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास

29 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्याचा सुतक कालावधीही विचारात घेतला जाईल. चंद्रग्रहणाच्या सुतक काळात पूजेसह सर्व शुभ कार्ये वर्ज्य असतील. मंदिरांचे दरवाजे बंद होतील. चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि मगच देवाला स्पर्श करा. चंद्रग्रहणाचे सुतक 9 तास आधी सुरु होते. चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी या काळात घराबाहेर पडू नका, देवाचे स्मरण करा, ग्रहणकाळात खाणेपिणे टाळा हे लक्षात ठेवा. चंद्रग्रहणानंतर स्नान जरुर करा, असे सांगण्यात येत आहे. 

2023 या वर्षातील सूर्यग्रहण

या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे.  हे ग्रहण सुद्धा भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक काल पाळवा लागणार नाही. या दिवशी सर्वपित्री दर्श अमावास्या असून हे ग्रहण कन्या राशीत होणार आहे.

( Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही. )