Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु, या राशींवर होणार सर्वाधिक परिणाम

Chandra Grahan 2023 Date and Time : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 2023 या  वर्षातील पहिले चंद्रग्रहण पुढील महिन्यात अर्थात 5 मे 2023 रोजी होणार आहे. हे ग्रहण काही राशींच्या लोकांसाठी चांगले असणार आहे. 

Updated: Apr 28, 2023, 08:58 AM IST
Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु, या राशींवर होणार सर्वाधिक परिणाम  title=

Chandra Grahan 2023 Date and Time : अनेकांना चंद्रग्रहणाची उत्सुकता लागून राहिली आहे. ते कधी होणार?, त्याची वेळ कोणती, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. या चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु झालेय. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात झाले आहे आणि आता 5 मे रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे. 

हे चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी रात्री 08.45 वाजता सुरु होईल आणि 6 मे 2023 रोजी मध्‍यरात्री 1.00 वाजता संपेल. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी असणार नाही. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारे हे चंद्रग्रहण छाया चंद्रग्रहण असेल. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. हे चंद्रग्रहण काही राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. या कोणत्या राशी कोणत्या आहेत, त्या जाणून घ्या. 

चंद्रग्रहण 2023 या राशींच्या लोकांसाठी शुभ

मिथुन -   
चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे.  या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असून मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगले तसेच लकी ठरणार आहे. या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. हाती पैसा राहिल. तसेच नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही काळ चांगला आहे. नफा होईल. परदेशात जाण्याचा योग असेल.

सिंह - 
वर्षातील पहिल्या चंद्रग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले संकेत देत आहे.  या चंद्रग्रहणामुळे सिंह राशीच्या लोकांना लाभदायक असणार आहे. तुमचे ध्येय पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा-स्पर्धेत यश मिळू शकेल. अनेक मनासारखे निर्णय मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तणाव-समस्यांपासून आराम मिळेल. त्यामुळे तुमचे आरोग्य छान राहिल.

मकर- 
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसले तरी या चंद्रग्रहणाचा मकर राशीच्या लोकांना खूप फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत. शनीची साडेसाती सुरु असली तरी हा काळ या लोकांना करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी मोठी संधी देईल. आर्थिक उत्पन्न वाढेल. संपत्तीत वाढ होईल. तुमचे अडकलेले पैसे मिळतील. अनेक ठिकाणांहून कमाई करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. त्यामुळे तुमचे चांगले वचन राहिल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)