Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

Chandra Grahan 2022 Sutak Kaal : आज (8 नोव्हेंबरला 2022) वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असून, ते भारतातील बहुतांश भागांमध्ये दिसणार आहे. भारतात हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा सूतक काळ 8 वाजून 21 मिनिटांनी सुरु होणार आहे. 

Updated: Nov 8, 2022, 11:14 AM IST
Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी  title=
chandra grahan 2022 Sutak Kaal precautions to be taken while going out frm home

Chandra Grahan 2022 Date and Time : दिवाळीच्या मुहूर्तावर आलेल्या सूर्यग्रहणामागोमाग आता चंद्रग्रहणाचा (Chandra ghrahan 2022) दिवसही उजाडला आहे. आज, मंगळवार 8 नोव्हेंबर 2022 रोजी वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) असेल. भारतातील बहुतांश भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. भारतात हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा सूतक काळ 8 वाजून 21 मिनिटांनी सुरु होणार आहे ( Chandra Grahan Sutak Kaal Time). ज्योतिषविद्येनुसार ग्रहण काळाच कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसते. पण, काही कारणास्तव सूतक काळात (Sutak kaal) तुम्हाला घराबाहेर पडावं लागणार असेल, तर 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा. 

पाहा ग्रहणाच्या सूतक काळात नेमकं काय करु नये...
 

गेरुचा वापर- ग्रहण काळात गर्भवती महिलांना (Pregnant woman) घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. पण, नोकरी किंवा तत्सम कारणासाठी अशा महिलांना घराबाहेर पडावं लागत असल्यास त्यांनी पोटावर थोडासा गेरू लावावा. असं केल्यानं गर्भात वाढणाऱ्या बाळावर ग्रहणाचे परिणाम होणार नाहीत. (chandra grahan 2022 sutak kaal precautions to be taken while going out frm home)

अती घाई टाळा- ग्रहणाच्या सूतक काळात तुम्ही घराबाहेर पडत असाल, तर कोणतंही काम अतीघाईनं करु नका. असं केल्यास तुमचं नुकसान होईल. नोकरीच्या (job) ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असेल तरीही हरकत नाही, पण घाई नको. पैशांचा व्यवहार सांभाळून करा. 

निसर्गाची थट्टा नको- ग्रहण आणि सूतक काळात निसर्गाची थट्टा चुकूनही करु नका. या काळाच पानं- फुलं तोडू नका. जेवणात टाकण्यासाठी तुळशीपत्र हवं असल्यास ते सूतक काळ सुरु होण्यापूर्वीच टाका. 

अधिक वाचा : Lunar Eclipse 2022: वर्षातलं शेवटचं च्रंद्रग्रहण; 12 राशींसाठी शुभ-अशुभ
 

धारदार शस्त्रांचा वापर टाळा- घरातून बाहेर पडणाऱ्यांनी ग्रहणाच्या सूतक काळाच धारदार शस्त्रांचा आणि अवजारांचा वापर टाळा. सुई, कातर, सेफ्टीपिन, सुरी या वस्तूंचा वापर टाळा. गर्भवती महिलांनी याबाबतची विशेष काळजी घ्या. 

जड काम टाळा- सूतक काळ आणि चंद्रग्रणादरम्यान गुरुत्वाकर्षण आकर्षित होतं. त्यामुळं यादरम्यान कोणतंही अवजच काम टाळाय परीक्षेच्या तयारीत मग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सलग अभ्यास करणं टाळा. रस्त्यावर वाहनं अतीवेगानं चालवू नका.