Moon Gochar: चंद्र 4 सप्टेंबर 2022 रोजी धनु राशीत करणार प्रवेश, मनाची घालमेल कशी राहील? जाणून घ्या

वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक ग्रह मानलं जातं. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचं मन अशांत किंवा स्थिर होतं.

Updated: Sep 4, 2022, 12:20 PM IST
Moon Gochar: चंद्र 4 सप्टेंबर 2022 रोजी धनु राशीत करणार प्रवेश, मनाची घालमेल कशी राहील? जाणून घ्या title=

Chandra Gochar In Dhanu Rashi: ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी एक ग्रह आहे. खगोलशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्रात चंद्राचं विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक ग्रह मानलं जातं. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचं मन अशांत किंवा स्थिर होतं. गोचर कुंडलीत चंद्राचं स्थान योग्य ठिकाणी असेल तर मन स्थिर राहतं आणि कामं व्यवस्थित होतात. तसं पाहिलं तर चंद्राच्या राशी बदलाचा 12 राशींवर परिणाम होतो. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. तसेच रोहिणी, हस्त आणि श्रवय या नक्षत्रांचा स्वामी आहे. नवग्रहांमध्ये चंद्राचा गोचर सर्वाधिक वेगाने म्हणजेच सव्वा दोन दिवसांनी होते. आज रात्री म्हणजेच 4 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर काय परिणाम होईल जाणून घ्या. 

चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्ष सुरु असल्याने चंद्राची कला वाढती आहे. त्यामुळे विचारांचा समतोलपणा राहील. चंद्र गोचर कुंडलीतील बारा स्थानाप्रमाणे फळ देईल. वृश्चिक राशीच्या दुसऱ्या, मीन राशीच्या दहाव्या आणि कुंभ राशीच्या अकाराव्या स्थानात असणार आहे. त्यामुळे या तीन राशींना सव्वा दोन दिवसात चंद्राचं पाठबळ मिळेल.

  • धनु रास- चंद्र पहिल्या स्थानात
  • वृश्चिक रास- चंद्र दुसऱ्या स्थानात
  • तूळ रास- चंद्र तिसऱ्या स्थानात
  • कन्या रास- चंद्र चौथ्या स्थानात
  • सिंह रास- चंद्र पाचव्या स्थानात
  • कर्क रास- चंद्र सहाव्या स्थानात
  • मिथुन रास- चंद्र सातव्या स्थानात
  • वृषभ रास- चंद्र आठव्या स्थानात
  • मेष रास- चंद्र नवव्या स्थानात
  • मीन रास- चंद्र दहाव्या स्थानात
  • कुंभ रास- चंद्र  अकराव्या स्थानात
  • मकर रास-चंद्र बाराव्या स्थानात

गोचर कुंडलीतील प्रथम स्थान यशापश, पूर्वज, सुख दु:ख, आत्मविश्वास, अभिमान आणि डोकं यासाठी गणलं जातं. या स्थानात चंद्र येणार असल्याने मन चंचल असणार आहे. वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामाच अनेक अडचणी येतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)