Budhaditya Rajyog 2023 : सूर्याच्या गोचरमुळे तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Budhaditya Rajyog 2023 : 16 जुलै रोजी पहाटेच सूर्य देवाने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य आणि बुध ज्यावेळी एका राशीमध्ये एकत्र येतात त्यावेळी बुधादित्य राजयोग तयार होतो. अनेक चांगले परिणाम मिळतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 16, 2023, 07:32 PM IST
Budhaditya Rajyog 2023 : सूर्याच्या गोचरमुळे तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव title=

Budhaditya Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. दरम्यान ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक प्रकारचे योग तयार होतात. 16 जुलै रोजी पहाटेच सूर्य देवाने कर्क राशीत प्रवेश केलाय. दरम्यान या राशीत बुध ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे कर्क राशीत खास राजयोग तयार झाला आहे. 

सूर्य आणि बुध ज्यावेळी एका राशीमध्ये एकत्र येतात त्यावेळी बुधादित्य राजयोग तयार होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो, त्यांना अनेक चांगले परिणाम मिळतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातोय. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होणार आहेत. अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. कार्यक्षेत्रात पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. या काळात जोडीदारासोबतचं नातं घट्ट राहणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामेही पूर्ण होतील. लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्यांनाही यश मिळेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. 

मकर रास

बुधादित्य योगाचे सकारात्मक परिणाम या राशीवर दिसून येणार आहेत. या काळात तुम्हाला चांगल्या बातम्या मिळू शकतात. तुमचं वैवाहिक जीवन निश्चित होऊ शकणार आहे. नोकरी बदलल्याने तुमचा पगार वाढणार आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य होणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग फलदायी ठरणार आहे. गुंतवलेल्या पैशातून नफा मिळण्याची शक्यता जास्त आहे. प्रगतीच्या संधी मिळतील आणि आरोग्य सुधारण्याची चिन्ह आहेत. नवीन पार्टनर मिळू शकतो.  उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता निर्माण होतेय. परदेशात नोकरीच्या संधी शोधत असलेल्यांनाही सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याची अपेक्षा करू शकता.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग शुभ मानला जातोय. राजयोगाच्या काळात पदोन्नतीचे संकेत आहेत. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ मिळण्याच्या नवीन संधी मिळतील. अविवाहित लोकांचे नाते पक्के होऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. जुन्या गुंतवणूकीता भविष्यात लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )