Mercury Retrogade 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर गोचर करतो. त्याचबरोबर सूर्य आणि चंद्र हे ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजता बुध ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला आहे. तर 30 डिसेंबर 2022 रोजी धनु राशीत वक्री अवस्थेत जाणार आहे. शुक्रवारी 11 वाजून 11 मिनिटांनी बुध ग्रह वक्री होणार आहे. म्हणजेच वर्षाच्या शेवटी धन, बुद्धि, व्यापाराचा कारक ग्रह वक्री अवस्थेमुळे 12 राशींवर परिणाम करेल. वक्री स्थितीचा जातकांवर परिणाम दिसून येईल. आर्थिक स्थिती, व्यापार, करिअर, वाणी यावर फरक दिसेल. पण तीन राशींना वक्री स्थितीचा फायदा होईल. यामध्ये मिथुन, सिंह आणि मकर राशीचा समावेश आहे. 18 जानेवारी 2023 रोजी बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी मार्गस्थ होईल. तर 7 फेब्रुवारी 2023 रोजी मंगळवारी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल.
मिथुन- मिथुन राशीचा स्वामी बुध असून वक्री स्थितीचा फायदा जातकांना होणार आहे. वर्ष 2023 च्या सुरुवातीला मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. नवी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. व्यापार करणाऱ्या लोकांना हा शुभ ठरणार आहे. या काळात बिझनेस सुरु करू शकता. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.
सिंह- या राशीच्या जातकांना बुधाची वक्री स्थिती फायद्याची ठरणार आहे. बुध वक्री होण्यासोबत शनिदेव राशी परिवर्तन करणार आहे. या दोन्ही बदलांचा सिंह राशीच्या लोकांना लाभ मिळेल. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामं मार्गस्थ होतील. या काळात कुटुंबाची मदत होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.
बातमी वाचा- Shani Dev: कुंडलीत शनिची अशा स्थितीमुळे तयार होतो राजयोग, कसं असतं गणित पाहा
मकर- या राशीतून बुध ग्रह वक्री होत धनु राशीत जाणार आहे. या स्थितीचा मकर राशीच्या लोकांना फायदा होईल. माहेरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल. नवीन गाडी खरेदी करण्याचा योग आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात चांगली ऑफर मिळू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)