Budh Gochar Effects: एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. नुकतंच बुध ग्रहाने गोचर केलंय. बुध हा बुद्धिमत्ता तसंच संवादाचा कारक मानला जातो. 8 जुलै रोजी बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. या ग्रहाच्या गोचरमुळे सर्व राशींच्या जीवनावर काहीना काही परिणाम होणार आहे.
मुळात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. मात्र क्रूर ग्रहासोबत आल्यानंतर तो अशुभ परिणाम देतो. असंच बुधाच्या या गोचरमुळे काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अशावेळी या राशीच्या व्यक्तींचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणासाठी बुधाचे गोचर कोणत्या राशींच्या व्यक्तींना नकारात्मक परिणाम देणार आहे.
कर्क राशीतील बुधाचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी तणावपूर्ण असू शकतो. कौटुंबिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. व्यवसायातही तुम्हाला चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. जीवनातील सुखसोयी कमी होऊ शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या कामगिरीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
बुध गोचरच्या काळात या राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगली पाहिजे. या गोचरचा परिणाम म्हणून जीवनातील सुख-सुविधांमध्ये घट होऊ शकते. गैरसमजामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात. जे व्यवसायाशी निगडीत आहेत त्यांना खूप मेहनत करावी लागेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. करिअरमध्येही काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. धनहानी होण्याची शक्यता आहे.
बुधाच्या गोचरमुळे या राशीच्या व्यक्तींना आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. तुमच्या कुटुंबात काही वाद निर्माण होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी फारसा अनुकूल नसेल. तुमच्या प्रेमसंबंधातही चढ-उतार असू शकतात. जुन्या एखाद्या निर्णयामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त दबावामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )