Budh Gochar 2022 After Diwali: ज्योतिषशास्त्र नऊ ग्रह आणि 12 राशींवर आधारीत आहे. प्रत्येक राशीत एका कालावधीनंतर ग्रह गोचर करत असतात. प्रत्येक ग्रहाचा गोचर (Grah Gochar) कालावधी त्या त्या ग्रहानुसार ठरलेला असतो. दिवाळीनंतर होणारं बुध ग्रहाच्या गोचरामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 26 ऑक्टोबरला बुध ग्रह (Budh Grah) तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या गोचराचा सर्वच राशींवर परिणाम दिसून येणार आहे. मात्र काही राशींना याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. व्यापार आणि आर्थिक स्थिती या काळात वेगाने सुधारेल. मकर, धनु, कुंभ आणि कन्या राशींना या गोचराचा फायदा होईल.
मकर- बुध ग्रहाच्या गोचरामुळे मकर राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम दिसतील. या काळात वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या निमित्ताने परदेश दौरा करावा लागू शकतो. या दौरा लाभदायी ठरेल. ग्रह अनुकूल असल्याने घरातील वातावरण व्यवस्थित असेल.
धनु- बुध तूळ राशीत प्रवेश करणार असल्याने या राशीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. या काळात उत्पन्न वाढेल. शेअर बाजार आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्राशी निगडित लोकांच्या जीवनात मोठा बदल दिसून येईल.
कुंभ- तूळ राशीत बुध ग्रहाचे संक्रमण होताच या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. या काळात आत्मविश्वास वाढेल. करिअरच्या क्षेत्रात नवीन उंची गाठाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
Laxmi Puja: लक्ष्मी पूजनात लाह्या-बताशांचा प्रसाद का असतो? जाणून घ्या यामागचं कारण
कन्या- दिवाळीनंतर या राशीच्या लोकांच्या जीवनात बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. या काळात आकस्मिक पैसे मिळतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आईसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. व्यावसायिकांना विशेषतः कौटुंबिक व्यावसायिकांसाठी हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात.