Baba Vanga : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार 'हे' भयानक संकट

 सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार आहे.

Updated: Nov 17, 2022, 08:09 PM IST
Baba Vanga :  बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार 'हे' भयानक संकट title=

Baba Vanga Prediction, नवी दिल्ली : बल्गेरियाचे बाबा वेंगा(Baba Vanga Prediction)  याने सन 2023 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी भारताची धडकी भरवणारी आहे. बाबा वेंगा भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याने सांगीतलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या देखील ठरल्या आहेत. सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार आहे.

बाबा वेंगा याने वर्तवलेली अनेक भाकीतं खरी ठरली

बाबा वेंगा याने आजपर्यंत वर्तवलेली अनेक भाकीतं खरी ठरली आहेत. तर बऱ्याचदा भविष्यवाणीबाबतचा त्याचा अंदाज चुकीचीही ठरला आहे. 2004 मध्ये त्सुनामीची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली होती. यानंतर त्यांनी 2021 साठी भाकीत केलेले भाकित देखील खरे ठरले आहे. बाबा वेंगा याने सन 2023 या येणाऱ्या वर्षाबाबत केलेली भविष्यवाणी अत्यंत खतरनाक आणि भयानक आहे. त्याची ही भविष्यवाणी भारताला धडकी भरवणारी अशी आहे. 

बाबा वेंगाची भारताबाबतची भविष्यवाणी

सन 2022 या वर्षात तापमानात बदल होईल असे भाविक बाबा वेंगाने वर्तवले होते. तशा प्रकारचे बदल हवामानात आणि तापमानात पहायला मिळत आहे. तापमानातील बदलामुळे टोळ किटकांचा प्रकोप वाढेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली आहे.

भारतात उपासमारी येईल

टोळ किटकांचा प्रकोप वाढून हे टोळ किटकाचे थवे भारतातील शेतांवर हल्ला करतील. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान येईल. पिकांच्या नुकसानीमुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी भारतात उपासमारीची समस्या निर्माण होईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. 

2021 मध्ये केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती

2021 मध्ये भारतासह अनेक देशांत टोळ किटकाचे थवे जगभरातील शेतांवर हल्ला करतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरली होती. 2021 मध्ये भारतासह अनेक देशांत टोळांच्या हल्ल्यामुळे बरीच पिके उद्ध्वस्त झाली होती.

2023 मध्ये जगावर काय संकट येणार

2023 मध्ये  भारतासह जगावर काय संकट येणार याबाबत देखील बाबा वेंगाने भाकीत वर्तवले आहे. 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलणार असल्याचे भाकित बाबा वेंगा याने केले आहे.  2023 मध्ये सर्वात मोठ्या खगोलीय घटनेची भविष्यवाणी देखील बाबा वेंगा याने केली आहे. पृथ्वीची कक्षा बदलल्याने त्याचे गंभीर परिणाम होऊन थेट जीव सृष्टीला धोका पोहचणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

कोण आहे हा बाबा वेंगा ?

बाबा वांगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला. वयाच्या 12 व्या वर्षी त्याची दृष्टी गेली. बल्गेरियाचे रहिवासी असलेले बाबा वेंगा हा फकीर होता. 1996 मध्ये त्याचा मृत्यू झाला. या सर्व भविष्यवाण्या बाबा वेंगाने कुठेही लिहून ठेवलेल्या नाहीत तर मृत्यूपूर्वी  त्याने त्यांच्या अनुयायांना या भविष्यवाण्या  सांगून ठेवल्या आहेत.

5079 साली जगाचा अंत होईल; बाबा वेंगाची भविष्यवाणी

5079 साली जगाचा अंत होईल अशी भविष्यवाणी  बाबा वेंगा याने केली आहे. विशेष म्हणजे बाब वेंगाने 5079 पर्यंतची भविष्यवाणीच आपल्या अनुयायांना सांगून ठेवली आहे.  बाबा वेंगा याने 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगा यांच्या अंदाजांपैकी जवळपास 85 टक्के भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.

बाबा वेंगाच्या महत्चाच्या भविष्यवाणी

बाबा वेंगाच्या काही भविष्यवाणी अत्यंत महत्वाच्या मानल्या आहेत. 2028 मध्ये  अंतराळवीर  शुक्र ग्रहावर पाऊल टाकतील. 2046 मध्ये अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वी पल्ला गाठेल. प्रत्यारोपणच्या मदतीने लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील अशा या भविष्यवाणी आहेत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)