Baba Vanga Predictions: पृथ्वीवर असं काय घडणारे? ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती

बाबा वेंगाच्या भाकितामुळे सर्वत्र भीती, पृथ्वीवर असं काय होणरेय ज्यामुळे तुम्हीही व्हाल थक्क  

Updated: Oct 1, 2022, 03:27 PM IST
Baba Vanga Predictions:  पृथ्वीवर असं काय घडणारे? ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती title=

Baba Vanga Predictions: भविष्यात काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते. अशात जर बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली असेल तर, प्रत्येकाला भीती वाटते. बाबा वेंगा (Baba Venga) यांनी आजपर्यंत अनेक भाकिते केली आहेत. ज्यामधील काही भाकितं खरी ठरली आहेत. त्यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. त्यांनी 111 वर्षांपूर्वी अशीच काही भविष्यवाणी केली होती, ज्याबद्दल आजही जगात भीती आणि दहशत आहे. या वर्ष 2022 बद्दल बोलायचे झाले तर, त्यांचे 2 अंदाज खरे ठरले आहेत, ज्यानंतर आता पुढील भविष्यवाण्या चर्चेत आहेत. (Baba Vanga Prediction For 2023)

भविष्याबद्दल सांगायचं झालं तर,  2023 साठी सुद्धा बाबा वेंगा यांनी आश्चर्यकारक भाकित केले आहेत. 2028 पर्यंत अंतराळवीर शुक्र ग्रहावर पोहोचतील. त्यानंतर, अनेक वर्षांनी, अशी वेळ देखील येईल जेव्हा पृथ्वीवर रात्र नसेल, असं देखील बाबा वेंगा यांनी सांगितलं आहे. 

बाबा वेंगा कोण होते?
बाबा वेंगाचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा (Vangeliya Pandeva Gushterova) होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला. 12 वर्षाचे असताना एका भीषण वादळामुळे त्याची दृष्टी गेली. अनेकांचा असा विश्वास आहे की या वादळाने त्यांना आंधळे केले असेल पण त्यांना भविष्य पाहण्याची विशेष शक्ती दिली असेल. बाबा वेंगा यांचे वयाच्या 85 व्या वर्षी 1996 मध्ये निधन झाले.

2022 मध्ये जगाचा अंत होईल असा अंदाज
बाबा वांगा प्रेडिक्शनने त्यांच्या आयुष्यात 5079 पर्यंत अनेक भाकिते दिली आहेत. ज्यामध्ये अनेक अंदाज खरे ठरले. यामध्ये जगातील विविध देशांवर टोळांचे हल्ले, पिण्याच्या पाण्याची कमतरता, भूकंप त्सुनामी असे अनेक भाकीत खरे ठरले आहेत. 2022 मध्ये जगाचा अंत होईल असे भाकीतही त्यांनी केले आहे.