Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही

Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस... 

Updated: Feb 9, 2023, 06:46 AM IST
Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही  title=
astro todays horoscope 9 february 2023 in marathi

Horoscope 9 February 2023 : नवा दिवस नव्या संधी आणि नव्या सकारात्मकतेनं सुरु झाला आहे. अशा या दिवशी तुमच्यासाठी नियतीनं खूप काही वाढून ठेवलं आहे. ते नेमकं काय? चला पाहूया... 

मेष (Aries)
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत. एखाद्या नव्या कामाच पुढाकारानं सहभागी व्हाल. 

वृषभ (Taurus )
अतिघाई आणि रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आज मोठ्या भावाशी शाब्दिक बाचाबाची होईल पण हा वाद मिटवण्यावर भर द्या. आजच्या दिवशी पैसे उधार घेऊ नका. 

मिथुन (Gemini )
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं. गणरायाची आराधना करावी. इच्छित फलप्राप्ती होईल. पैशांची उधळपट्टी टाळा. 

कर्क (Cancer )
संपत्तीत नव्यानं भर टाकाल. आज विवाहित महिला एखादा नवा दागिना खरेदी करु शकतात. एखाद्या प्रवासाला जाण्याचा बेत आखू शकता. 

हेसुद्धा वाचा : Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर्वांचा करा 'हा' उपाय, गणपती बाप्पा पूर्ण करतील तुमची इच्छा

सिंह (Leo )
मोठा प्रवास घडणार आहे. मित्रपरिवार आणि आप्तेष्टांची साथ असेल. अविवाहितांसाठी आज स्थळं येणार आहेत. 

कन्या (Virgo )
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर तुमच्या कामाचा प्रभाव असेल. नव्या व्यक्तींना भेटाल, चर्तेतूनच तुमच्या समस्यांवर तोडगा निघेल. 

तुला (Libra )
एखादी शुभवार्ता मिळणार आहे. आजचा दिवस शुभ आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी आहे. आज तुमच्या परागवाढीवर चर्चा होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio )
नवं वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. अवाजवी खर्च टाळा. येत्या काळात नवं घर घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव आजच्याच दिवसापासून सुरु करा. 

धनु (Sagittarius )
नोकरीमध्ये बढती मिळणार आहे. तुमच्या कामाच्या बळावर तुम्ही मोठे होणार आहात. एखादं वाहन खरेदी करु शकता. 

मकर (Capricorn )
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आज खास व्यक्तीच्या भेटीनं तुम्ही भारावून जाल. मोठ्यांचे आशीर्वाद आज मदत करतील. 

कुंभ (Aquarius )
नोकरीच्या ठिकाणी काहीतरी नवं शिकण्याची संधी मिळेल. आपल्या माणसांना जपा. आज तुम्हाला पगारवाढीचे संकेत मिळणार आहेत. 

मीन (Pisces )
मित्रांशी वाद घालू नका. कुटुंबात शुभकार्यांची सुरुवात होणार आहे. येणारा काळ अतिशय मंगलमय आहे.