5 वर्षानंतर सूर्य-शुक्राची होणार युती; 'या' राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता

Venus And Sun Yuti: 13 फेब्रुवारीला सूर्य देव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 7 मार्च रोजी धनाचा दाता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य देवाची युती होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 23, 2024, 09:15 AM IST
5 वर्षानंतर सूर्य-शुक्राची होणार युती; 'या' राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता title=

Venus And Sun Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट अंतरानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी ग्रहांच्या या राशी बदलामुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग होतो. याचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. 

13 फेब्रुवारीला सूर्य देव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 7 मार्च रोजी धनाचा दाता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये शुक्र आणि सूर्य देवाची युती होणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी अशा आहेत ज्यांना यावेळी चांगले परिणाम मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

सूर्य आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. सूर्यदेवाच्या प्रभावामुळे मान-प्रतिष्ठा मिळणार आहे. संपत्ती मिळवण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी खूप छान असेल. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो.

मेष रास (Aries Zodiac)

सूर्य आणि शुक्र यांचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची बँक बॅलन्स वाढवून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर वेळ चांगली आहे. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

शुक्र आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)