Navpancham Rajyog 2022 : 12 वर्षानंतर तयार होतोय नवपंचक योग! फलश्रूती कशी असेल जाणून घ्या

Navpanchak Yog 2022 : नोव्हेंबर महिन्यात एका पाठोपाठ एक ग्रह राशी बदल (Grah Gochar) करत आहेत. तर गुरु ग्रह मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ग्रहांच्या गोचरामुळे 11 नोव्हेंबरपासून ग्रहांची शुभ स्थिती तयार झाली आहे. गुरु आणि शुक्रामुळे नवपंचम राजयोग (Navpanchak Rajyog) तयार झाला आहे. 

Updated: Nov 15, 2022, 07:14 PM IST
Navpancham Rajyog 2022 : 12 वर्षानंतर तयार होतोय नवपंचक योग! फलश्रूती कशी असेल जाणून घ्या title=

Navpanchak Yog 2022 : नोव्हेंबर महिन्यात एका पाठोपाठ एक ग्रह राशी बदल (Grah Gochar) करत आहेत. तर गुरु ग्रह मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ग्रहांच्या गोचरामुळे 11 नोव्हेंबरपासून ग्रहांची शुभ स्थिती तयार झाली आहे. गुरु आणि शुक्रामुळे नवपंचम राजयोग (Navpanchak Rajyog) तयार झाला आहे. 13 नोव्हेंबरला बुधाच्या गोचरामुळे गुरु आणि बुध नवपंचम राजयोग तयार झाला आहे. तर 16 नोव्हेंबरला सूर्याचा वृश्चिक राशीतील गोचरामुळे गुरु आणि बुध नवपंचम राजयोग तयार होणार आहे. अशात ज्या राशींचे स्वामी गुरु, बुध, शुक्र आणि सूर्य असेल त्यांना या स्थितीचा फायदा होईल. जिथपर्यंत या ग्रहांचा गोचर दुसऱ्या राशीत होत नाही तोपर्यंत ही स्थिती असणार आहे. त्यामुळे पाच राशींना फायदा होणार आहे. 

वृषभ (Vrushabh) : नवपंचम राजयोग वृषभ राशीसाठी लाभदायी ठरेल. या राशीच्या लोकांना नोकरीची नवी संधी मिळेल. तसेच या काळात पदोन्नती, पगार वाढण्याची शक्यता आहे. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. विशेषत: परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. राजकारण्यांना या उच्च पदे मिळू शकतात.

मिथुन (Mithun): नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होईल. कोर्टात काही प्रकरण असेल तर ते निकाली लागू शक्यता आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात धनलाभ होईल. एखाद्या मोठ्या आजारातून मुक्तता होऊ शकते. 

कर्क (Kark) : कर्क राशीच्या लोकांना या काळात नशिबाची साथ मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. प्रवास योग जुळून येणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे.

Margashirsh 2022: मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरूवार कधी, जाणून घ्या महालक्ष्मी घट मांडणी आणि पूजा विधी

तूळ (Tula): हा राजयोग तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. वकृत्वाच्या जोरावर काम होतील. अचानक चांगली बातमी मिळू शकते. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे.

कुंभ (Kumbh) : नोकरी आणि व्यवसाय दोन्हीसाठी वेळ उत्तम आहे. काही बदल होऊ शकतात, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)