मुंबई : बुधवारी अक्षय तृतीया. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जात असून शुभ मानला जातो. चैत्र शुक्ल, प्रतिपदा, अक्षय तृतीया असा हा सण. अक्षयचा अर्थ क्षय होणार नाही असं. तसेच हा दिवस परशुरामाचा जन्मदिन म्हणून परशुराम तिथी म्हणून साजरा केला जातो. बुधवारी 18 एप्रिल रोजी म्हणजे उद्या अक्षय तृतीया हा सण आहे.
लाभ - सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत
शुभ - सकाळी 10.45 ते 12.20 वाजेपर्यंत
दुपारी - लाभ 15.30 ते 18.45 पर्यंत
अमृत - रात्री 20.08 ते मध्य रात्री 12.20 वाजेपर्यंत
अक्षय तृतीया ही मंगळवारी रात्री 3.45 ला सुरू होणार असून बुधवारी रात्री 1.45 पर्यंत असणार आहे. या दिवशी सूर्य मेषच्या उच्च राशीमध्ये. चंद्र वृषभमध्ये, कृतिका नक्षत्र आणि आयुष्यमान योग असा योग असणार आहे. त्यामुळे यावर्षीची अक्षय तृतीया खास असणार आहे. हा योग तब्बल 11 वर्षानंतर येत आहे. तसेच अक्षय तृतीयेला आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. अशावेळी नेमकी कोणती काळजी घ्याल
24 कॅरेट सोनं हे अस्सल शुद्ध सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र तुम्ही हे सोनं भविष्यात दागिने करण्याच्या हेतूने घेत असाल तर 24 कॅरेट सोनं घेणं निरूपयोयी ठरणार आहे.
दागिने हे 18 किंवा 22, 23 कॅरेट्समध्ये बनवले जातात. 24 कॅरेट्सच्या तुलनेत त्याची किंमतही कमी असते.
सोनं खरेदी करताना त्यावरील ट्रेडमार्कसही तपासून पहा. ट्रेडमार्क हे सोन्याच्या शुद्धतेच्या खात्री देते. ज्या दागिन्यांवर, सोन्याच्या बिस्किटं, वळीवर ट्रेडमार्क नसेल तर त्याची खरेदी करणं टाळा.
सोन्यामध्ये मोती किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही इतर खड्यांचं काम असेल, मीनावर्क असेल तर असे दागिने विकत घेताना काळजी घ्या. कारण भविष्यात जर तुम्हांला अशाप्रकारचे दागिने विकावे लागल्यास त्यामधील केवळ सोन्याचे पैसे तुम्हांला मिळतील.
भविष्यात गुंतवणूक म्हणून अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर ते सोन्याचे बिस्किट किंवा वळी किंवा कॉईनच्या स्वरूपात विकत घ्या.