Todays Panchang : आज श्री विष्णूचा वार; पाहा पंचांगानुसार काय आहे मुहूर्त आणि अशुभ काळ

Todays Panchang : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे राशीभविष्य सांगेल. पण, आजच्या दिवसातील महत्त्वाच्या वेळा, तिथी आणि योग याबद्दलची माहिती मात्र तुम्हाला पंचांगातूनच मिळेल.   

Updated: Mar 9, 2023, 07:12 AM IST
Todays Panchang : आज श्री विष्णूचा वार; पाहा पंचांगानुसार काय आहे मुहूर्त आणि अशुभ काळ  title=
9 march 2023 thursday todays panchang mahurat

Todays Panchang : सणवार उरकून आता अनेकजण पुन्हा एकदा त्यांच्यात्यांच्या कामाला लागले आहेत. यातच एक नवा आठवडा आता संपण्याच्या मार्गावर आहे. आठवड्याचा शेवट जवळ असतानाच आता काही उरलेली, विसर पडलेली कामं मार्गी लावण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. पण, त्याआधी तुम्ही योजलेलं एखादं शुभकार्य करण्याच्या प्रयत्नांत आहात का? शुभमुहूर्ताच्या शोधात आहात? तर पाहा आजचं पंचांग. कारण, एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करण्याआढी शुभ वेळा पाहणं कधीही उत्तम. पंचांग तुम्हाला याची कल्पना देईल. यातून तुम्हाला तिथी, योग, चंद्ररास अशी सविस्तर आणि सोपी माहितीही मिळेल. (9 march 2023 thursday todays panchang mahurat )

आजचा वार - गुरुवार    
तिथी- द्वितीया
नक्षत्र - हस्त 
योग - गण्ड
करण- तैतुल 

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:38 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.25 वाजता
चंद्रोदय -  सायंकाळी 08.07 वाजता  
चंद्रास्त - सकाळी 07:40 वाजता  
चंद्र रास- कन्या   

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 10:34:08 पासुन 11:21:18 पर्यंत, 15:17:05 पासुन 16:04:15 पर्यंत
कुलिक– 10:34:08 पासुन 11:21:18 पर्यंत
कंटक– 15:17:05 पासुन 16:04:15 पर्यंत
राहु काळ– 14:00:27 पासुन 15:28:53 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 9 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे!

 

कालवेला/अर्द्धयाम– 16:51:24 पासुन 17:38:34 पर्यंत
यमघण्ट–07:25:30 पासुन 08:12:40 पर्यंत
यमगण्ड– 06:38:20 पासुन 08:06:46 पर्यंत
गुलिक काळ–  काळ09:35:11 पासुन 11:03:37 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:08:27 पासुन 12:55:37 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद, अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी

चंद्रबल- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)