Todays Panchang : आजचा दिवस खूप शुभ, तिथीपासून शुभ मुहूर्तांपर्यंत जाणून घ्या आजचं पंचांग

Todays Panchang : हिंदू धर्मात पंचांगला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र, तिथी, शुभ, अशुभ, वेळ हे सगळं पाहिलं जातं. आजचा दिवस खूप खास आहे. 

Updated: Mar 17, 2023, 06:08 AM IST
Todays Panchang : आजचा दिवस खूप शुभ, तिथीपासून शुभ मुहूर्तांपर्यंत जाणून घ्या आजचं पंचांग title=
17 march 2023 friday todays panchang mahurat latest astro news in marathi

Todays Panchang : आज शुक्रवार...म्हणजे देवीचा वार..माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्यातच चैत्र महिन्यातील एकादशीचा मुहूर्त आज सुरु होतो आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे केले जातात. म्हणून एकादशीचं व्रत हे शनिवारी 18 मार्च 2023 ला पाळलं जाणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला आजचा संपूर्ण दिवसाचं पंचागं जाणून घेऊयात. (17 march 2023 friday todays panchang mahurat latest astro news in marathi)

आजचे पंचांग!

आजचा वार - शुक्रवार
तिथी- दशमी
नक्षत्र - उत्तराषाढा
योग - व्यतीपात
करण- गर

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:37 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.32 वाजता
चंद्रोदय -  दुपारी 03.10 वाजता  
चंद्रास्त - सकाळी 01:57 वाजता  
चंद्र रास- वृश्चिक 
ऋतू - वसंत 

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त– 8:53:32 पासून 09:41:37 पर्यंत 12:53:55 पासून 13:41:59 पर्यंत
कुलिक– 8:53:32 पासून 09:41:37  पर्यंत
कंटक– 13:41:59 पासून 14:30:04 पर्यंत
राहु काळ– 10:59:44 पासून 12:29:52 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 15:18:08 पासून 16:06:13 पर्यंत
यमघण्ट–16:54:17 पासून 17:42:22 पर्यंत
यमगण्ड– 15:30:09 पासून 17:00:18 पर्यंत
गुलिक काळ– 07:59:27 पासून 09:29:35 पर्यंत

शुभ काळ

अभिजीत मुहूर्त - 12:05:50 पासून 12:53:55 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल- मिथुन, कर्क, तुला धनु, कुंभ, मीन

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)