'बिग बॉस'च्या काही सिक्रेट गोष्टी....

Sep 22, 2015, 17:06 PM IST
1/8

बिग बॉसच्या घरातील कॅमेरे... हाच या कार्यक्रमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे... आत्तापर्यंत कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅमेरे वापरण्यात आलेले नाहीत. इथं दोन प्रकारचे कॅमेरे वापरण्यात आलेत.. घराच्या आत 'रोबोटिक' कॅमेरे आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये 'ट्रॅक' कॅमेरे... 

2/8

बिग बॉसचं घर तुम्हाला दररोजचा एपिसोड पाहताना चकाचक दिसतं... होय ना... पण, हे घर स्पर्धक साफ करत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करताय... कारण बिग बॉसचा क्लिनिंग स्टाफ ही सगळी कामं करतो. 

3/8

बिग बॉस हा एक रिअॅलिटी कार्यक्रम असला तरीदेखील या घरात घडणाऱ्या अनेक गोष्टी कॅमेऱ्यावर येत नाहीत... चॅनलला ज्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या असतील त्याच गोष्टी तुम्हाला दिसतात... मग, ते स्पर्धकांचे अश्लील चाळे असो किंवा सलमानबद्दल वाईट गोष्टी असो... तुम्हाला एडिटेड एपिसोड बघावा लागतो.   

4/8

बिग बॉसचं घर हे एखाद्या भूतबंगल्यापेक्षा कमी नाही... इथं बिग बॉस क्रू आणि स्पर्धकांसोबत अनेक धक्कादायक प्रसंग घडलेत. रात्री-अपरात्री आपल्या छातीवर एखादी बाई बसलीय असा भास आत्तापर्यंत अनेकांना झालाय... आणि अनेकांनी तो आपल्या मित्रमंडळींसोबत हा अनुभव शेअरही केलाय. 

5/8

या कार्यक्रमासाठी खास सलमानचे डायलॉग लिहिण्यासाठी एका स्क्रीप्ट रायटरचीही व्यवस्था कार्यक्रम निर्मात्यांनी केलेली असते... पण, सलमान खान कुणाचं ऐकतो का.... तो करतो तेच जे त्याला करायचं असतं... प्रत्येक एपिसोडची एक डीव्हीडी शूटींगनंतर सलमानला दिली जाते... ही सीडी पाहिल्यानंतर पुढे काय करायचं हेदेखील सलमानच ठरवतो. मग आता या कार्यक्रमाचा रिअल बॉस कोण? याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल... 

6/8

तुम्हाला माहीत आहे का की या कार्यक्रमाच्या शूटींगसाठी सलमान खान आठवड्यातून केवळ एक दिवस वेळ देतो... आणि जवळपास त्याचं प्रत्येक दिवसांचं मानधन हे जवळपास 6 करोड रुपयांच्या आसपास असतं. 

7/8

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनला पहिला प्रश्न असतो तो हा कार्यक्रम कोण होस्ट करणार असा... प्रत्येक वेळी हा सीझन सलमान होस्ट करणार नाही, अशा शक्यता व्यक्त केल्या जातात. पण, या कार्यक्रमाचे निर्माते मात्र सलमानला खेचून आणण्यात प्रत्येक वेळी यशस्वी होतात. 

8/8

'बिग बॉस'चा सीझन नऊ लवकरच सुरू होणार आहे... आणि तुम्ही जर 'बिग बॉस'चे फॅन असाल आणि एकही सीझन तुम्ही मिस केला नसेल तर आपल्याला या कार्यक्रमाबद्दल सगळं काही ठावूक असल्याच्या अविर्भावात तुम्ही असाल... तर हे वाचाच... 