डासांपासून वाचवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती

Nov 18, 2014, 09:58 AM IST
1/10

10) लेमन बाम: लेमन बाम सुद्धा डासांपासून तुम्हाला दूर ठेवतो. लेमन बाम ही वनस्पती वेगानं वाढते आणि ती खोलीत ठेवता येत. लेमन बामच्या पानांमध्ये सिट्रोनेला अधिक प्रमाणात असतं. अनेक कमर्शियल मॉस्किटो रिप्लियंट्समध्ये याचा वापर केला जातो. लेमन बाममध्ये जवळपास 38 टक्के सिट्रोनेलाचं प्रमाण असतं. डासांना दूर ठेवण्यासाठी याला घरात लावा. डासांपासून वाचण्यासाठी लेमन बामची पानं चोळून आपल्या त्त्वचेवरही लावू शकता. 

2/10

9) तुळस: तुळस ही एक मॉस्किटो रिप्लीयन्ट आहे.तुळस एक औषधी वनस्पती आहे, जी दाबता आपला सुवास पसरते. डासांना दूर ठेवण्यासाठी कुंडीत तुळस लावावी आणि घराच्या मागच्या भागात ठेवावी. तुळशीची पानं चोळून ती त्त्वचेवर पण लावू शकता. जेवणात स्वाद आणण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो. आपण कोणत्या प्रकारची तुळस लावू शकता. मात्र दालचीनी तुळस, लिंबू तुळस आणि पेरू तुळस आपल्या जास्त सुगंधामुळं अधिक फायदेशीर आहे. 

3/10

8) लवेंडर: लवेंडर डासांना दूर ठेवण्यासाठी एक जबरदस्त वनस्पती आहे. लवेंडर  सहज उगवणारी वनस्पती आहे. कारण तिला जास्त काळजी घेण्याची गरज नसते. ही वनस्पती 4 फूट उंचीवर उगवते आणि वाढीसाठी वनस्पतीला सूर्यप्रकाशाची गरज असते. केमिकल फ्री मॉस्किटो सोल्यूशन बनविण्यासाठी लवेंडर ऑईल सरळ पाण्यात मिसळून स्कीनवर लावता येतं. डासांना नियंत्रित ठेवण्यासाठी ही वनस्पती बसण्याच्या ठिकाणी लावावी. म्हणजे घरात... डासांना दूर ठेवण्यासाठी लवेंडर ऑईल मान, मनगट आणि गुडघ्यांवर पण लावू शकता. 

4/10

7) कडूलिंब: कडूलिंबाचं झाड एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लीयन्ट आहे. कीडे, मुंगळे आणि डासांपासून कडूलिंब तुम्हाला दूर ठेवतं. बाजारात कडूलिंबाचे तत्त्व असलेले अनेक मॉस्किटो रिप्लीयन्ट आणि बाम उपलब्ध आहेत. डासांना पळविणय्साठी आपल्या अंगणात कडूलिंबाचं झाड तुम्ही लावू शकता. किंवा त्याची पानं जाळून डास पळवू शकता. त्याच्या तेलाचा कॅरोसिन लँप आणि सिट्रोनेला फ्लेर्समध्ये वापर करू शकता. डासांना दूर ठेवण्यासाठी आपण आपल्या स्कीनवर कडूलिंबाचं तेल लावल्यास उपयुक्त ठरतं. मलेरियापासून वाचण्यासाठी कडूलिंब वापरात येवू शकतं. 

5/10

6)  हॉर्समिंट: हॉर्समिंट पण डासांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. ही एक बारमाही वनस्पती आहे, ज्याला विशेष काळजीची गरज नाही. याचा वास सिट्रोनेला सारखा असतो. ही वनस्पती उन्हाळा आणि रेती दोन्हीत उगवतं. याचे फुलं गुलाबी असतात. आपल्या ऑईलमध्ये असलेल्या थायमोलसारख्या अॅक्टिव्ह इंग्रीडेंटमुळं हे कवच आणि बॅक्टिरियाचा नाश करणारा आहे. ताप असतांना त्यावर उपाय म्हणूनही याचा वापर होतो. 

6/10

5) एग्रेटम: एग्रेटम झाडही चांगली मॉस्किटो रिप्लीयन्ट आहे. या झाडाची फुल हलक्या निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात. जे कौमारिन तयार करतं. कौमारिन एक भयंकर वास आहे जो डासांना दूर ठेवतो. कौमारिनचा वापर कमर्शिअल मॉस्किटो रिप्लीयन्ट आणि परफ्यूम इंडस्ट्रीत होतो. एग्रेटमला त्वचेवर लावू नये कारण यात काही असे तत्व असतात जे स्कीनसाठी नुकसानदायक असतात. हे झाडं उन्हाळ्यात सूर्याच्या संपूर्ण प्रकाशात उगवतात. 

7/10

4) कॅटनिप: कॅटनिप एक औषधी वनस्पती आहे. जी पुदिन्याच्या झाडासारखी दिसते. नुकतंच या वनस्पतीलाही मॉस्किटो रिप्लीयन्टचा दर्जा दिला गेलाय. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार डीईईटीपासून दहा पट जास्त असरदार आहे. ही एक बारमाही वनस्पती आहे जी दोन्ही ऊन आणि सावलीत वाढते. याची फुलं पांढरे आणि लवेंडर रंगाची असतात. डासांना दूर ठेवण्यासाठी याला घराच्या मागील छतावर लावावं. माजरांना या वनस्पतीचा सुवास आवडतो म्हणून वनस्पतीची काळजी घेऊन तिला कुंपनात ठेवावं. या वनस्पतीची पानं चोळून त्याचा रस चेहऱ्यावरही लावता येतो. 

8/10

3) झेंडू: झेंडूच्या फुलांमध्ये सुवास असतो जो माणूस, माशी आणि डासांना आवडत नाही. ही वनस्पती 6 इंच उंचीपासून 3 फूटापर्यंत वाढते. झेंडूचे झाड आफ्रिकन आणि फ्रेंच अशा दोन जातींचे असतात. दोन्हीही मॉस्टिकोट रिप्लीयन्ट आहेत. झेंडूची फुलं अब्जियोंजवळच उगवले जातात कारण ते एफिड्स आणि इतर किड्यांना दूर ठेवतो. झेंडूची फुलं पिवळ्या रंगापासून तर डार्क ऑरेंज आणि लाल रंगाचीही असतात. हे झाड सूर्य प्रकाशात वाढतं म्हणून सावलीत त्यांची वाढ खुंटते. डासांना दूर ठेवण्यासाठी झेंडूचं झाड वाड्यात, बगीच्यात लावावं. 

9/10

2) सिट्रोनेला ग्रास: सिट्रोनेला ग्रास डासांना दूर ठेवण्याचा एक चांगला उपाय आहे. 2 मीटरपर्यंत त्यांची वाढ होते आणि याचे फुल लवेंडर सारख्या रंगाचे असतात. या गवतातून  निघणाऱ्या सिट्रोनेला ऑईलचा मेणबत्ती, परफ्यूम्स, लॅम्प्स इत्यादी हर्बल प्रॉडक्ट्स बनविण्यासाठी वापर केला जातो. सिट्रोनेला ग्रास डेंग्यू तयार करणाऱ्या डासांना (एडीज एजिप्टी) दूर ठेवतं. डासांना दूर करण्यासाठी सिट्रोनेला ऑईलला बगीच्यात जळत असलेल्या मेणबत्ती, दिवा, कंदिलावर शिंपडावे. सिट्रोनेला ग्रासमध्ये  अँटी फंगल प्रॉपर्टीही आहे. सिट्रोनेला ग्रास त्त्वचेसाठी अतिशय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. कोणत्याही प्रकारचं नुकसान या झाडामुळं होत नाही. 

10/10

सध्या संपूर्ण राज्यामध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू आहे. अशा साथींच्या आजारांचं मुख्य कारण असतं ते म्हणजे डास... आपण डास घालविण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर करतो. पण त्यामुळं आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीचं नुकसान होतं. नैसर्गिक पद्धतीनं आपण डासांपासून मुक्ती मिळवू शकतात. काही खास मॉस्किटो रिप्लियन्ट प्लांट्स आपल्या बगीच्यात लावल्यानं डासांपासून तर सुटका होतेच पण बगीच्याचं सौंदर्यही वाढतं...

1) रोजमेरी: रोजमेरी एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लियन्ट आहे. रोजमेरीचं झाड 4-5 फूटापर्यंत वाढतं आणि त्याला निळे फुलं असतात. उन्हाळ्यात हे झाड वाढतं आणि हिवाळ्यात हे जीवंत राहत नाहीत, या झाडाला गर्मीचीच गरज असते. म्हणून रोजमेरीला कुंडीतच लावावं आणि हिवाळ्यात घरात ठेवावं. रोजमेरीचा वापर हंगामी स्वयंपाकासाठी पण होतो. उन्हाळ्यात रोजमेरीची कुंडी बगीचात ठेवावी.  रोजमेरी मॉस्किटो रिप्लियन्टचे 4 थेंब एक चतुर्थांश ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावावं. मात्र त्याला थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावं. 

सध्या संपूर्ण राज्यामध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू आहे. अशा साथींच्या आजारांचं मुख्य कारण असतं ते म्हणजे डास... आपण डास घालविण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर करतो. पण त्यामुळं आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीचं नुकसान होतं. नैसर्गिक पद्धतीनं आपण डासांपासून मुक्ती मिळवू शकतात. काही खास मॉस्किटो रिप्लियन्ट प्लांट्स आपल्या बगीच्यात लावल्यानं डासांपासून तर सुटका होतेच पण बगीच्याचं सौंदर्यही वाढतं... 1) रोजमेरी: रोजमेरी एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लियन्ट आहे. रोजमेरीचं झाड 4-5 फूटापर्यंत वाढतं आणि त्याला निळे फुलं असतात. उन्हाळ्यात हे झाड वाढतं आणि हिवाळ्यात हे जीवंत राहत नाहीत, या झाडाला गर्मीचीच गरज असते. म्हणून रोजमेरीला कुंडीतच लावावं आणि हिवाळ्यात घरात ठेवावं. रोजमेरीचा वापर हंगामी स्वयंपाकासाठी पण होतो. उन्हाळ्यात रोजमेरीची कुंडी बगीचात ठेवावी.  रोजमेरी मॉस्किटो रिप्लियन्टचे 4 थेंब एक चतुर्थांश ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावावं. मात्र त्याला थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावं.