इंद्राणीनं शीनाला का मारलं? मर्डर मिस्ट्रीमधील ८ महत्त्वाचे व्यक्ती

Aug 26, 2015, 22:20 PM IST
1/8

ड्रायव्हर

इंद्राणीच्या अटकेपूर्वी पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर इंद्राणीच्या ड्रायव्हरला अटक केली होती. ड्रायव्हरनं पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला आणि सांगितलं इंद्राणीच्या सांगण्यावरून ही हत्या केली आणि मृतदेह रायगडच्या जंगलात फेकला. मुंबई पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधून सांगाडा हस्तगत केला. त्यानंतर इंद्राणीला अटक करण्यात आली. आता इंद्राणी आणि ड्रायव्हर दोघांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

ड्रायव्हर इंद्राणीच्या अटकेपूर्वी पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर इंद्राणीच्या ड्रायव्हरला अटक केली होती. ड्रायव्हरनं पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला आणि सांगितलं इंद्राणीच्या सांगण्यावरून ही हत्या केली आणि मृतदेह रायगडच्या जंगलात फेकला. मुंबई पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधून सांगाडा हस्तगत केला. त्यानंतर इंद्राणीला अटक करण्यात आली. आता इंद्राणी आणि ड्रायव्हर दोघांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

2/8

राहुल मुखर्जी:

पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा राहुल मुखर्जी. शीना आणि राहुलमध्ये प्रेमसंबंध होते. पीटर आणि इंद्राणीला हे नातं मान्य नव्हतं. यामुळं राहुलनं हे नातं संपवलं होतं. मात्र जेव्हापासून शीना बेपत्ता झाली, तेव्हापासून राहुलला संशय होता काही तरी गडबड आहे. त्यादरम्यान राहुलनं पीटरला सांगितलं कदाचित शीना इंद्राणीची बहिण नाही मुलगी आहे. मात्र पीटरने राहुलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.

 

राहुल मुखर्जी: पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा राहुल मुखर्जी. शीना आणि राहुलमध्ये प्रेमसंबंध होते. पीटर आणि इंद्राणीला हे नातं मान्य नव्हतं. यामुळं राहुलनं हे नातं संपवलं होतं. मात्र जेव्हापासून शीना बेपत्ता झाली, तेव्हापासून राहुलला संशय होता काही तरी गडबड आहे. त्यादरम्यान राहुलनं पीटरला सांगितलं कदाचित शीना इंद्राणीची बहिण नाही मुलगी आहे. मात्र पीटरने राहुलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.  

3/8

पीटर मुखर्जी:

शीनाचा तीसरा आणि वर्तमानातील नवरा... स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी आहे. इंद्राणी त्यांची दुसरी पत्नी आहे. दोघांनी २००२मध्ये लग्न केलं होतं. पीटरनुसार पहिले तर त्यांना याप्रकरणात इंद्राणीला अटक झाल्याचं पाहूनच धक्का बसलाय. त्यात शीना इंद्राणीची बहिण नाही तर मुलगी असल्याचं ऐकून अधिकच धक्का बसलाय.

पीटर मुखर्जी: शीनाचा तीसरा आणि वर्तमानातील नवरा... स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी आहे. इंद्राणी त्यांची दुसरी पत्नी आहे. दोघांनी २००२मध्ये लग्न केलं होतं. पीटरनुसार पहिले तर त्यांना याप्रकरणात इंद्राणीला अटक झाल्याचं पाहूनच धक्का बसलाय. त्यात शीना इंद्राणीची बहिण नाही तर मुलगी असल्याचं ऐकून अधिकच धक्का बसलाय.

4/8

संजीव खन्ना:

संजीव खन्ना इंद्राणीचा दुसरा नवरा आहे. इंद्राणीच्या अटकेनंतर बुधवारी कोलकातामधून संजीव खन्नाला त्याच्या मित्राच्या घरातून अटक करण्यात आली. शीनाच्या हत्येत त्यानं इंद्राणीची मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

संजीव खन्ना: संजीव खन्ना इंद्राणीचा दुसरा नवरा आहे. इंद्राणीच्या अटकेनंतर बुधवारी कोलकातामधून संजीव खन्नाला त्याच्या मित्राच्या घरातून अटक करण्यात आली. शीनाच्या हत्येत त्यानं इंद्राणीची मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

5/8

मिखाईल बोरा:

या प्रकरणात सर्वात मोठा साक्षीदार मिखाईल बोरा ठरू शकतो. तो इंद्राणीचा मुलगा आणि शीनाचा धाकटा भाऊ आहे. इंद्राणी शीना आणि मिखाईलसाठी गुवाहाटीला पैसे पाठवायची. ११व्या वर्गापर्यंत शीना आपल्या आजी-आजोबांकडे राहून शिकली, नंतर ती शिकायला बाहेर गेली. त्यानंतर नोकरीसाठी मुंबईत आली. २०१२ साली शीना गुवाहाटीला आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेली आणि तिथून परतल्यानंतर बेपत्ता झाली. इंद्राणीनं सर्वांना सांगितलं होतं की, शीना अमेरिकेत नोकरीसाठी गेलीय. एवढंच नव्हे तर इंद्राणीनं शीनाचे अमेरिकेतील काही फोटो पण दाखवले होते. मिखाईलनं मीडियाशी बोलतांना सांगितलं की, शीना तिच्यात आणि इंद्राणीमध्ये झालेल्या काही गोष्टींबद्दल सांगायची, पण त्या आताच सार्वजनिक करणार नाही. इंद्राणी पोलिसांसमोर काय सांगते, त्यानंतर मी सांगेन, असं मिखाईल म्हणतो.

मिखाईल बोरा: या प्रकरणात सर्वात मोठा साक्षीदार मिखाईल बोरा ठरू शकतो. तो इंद्राणीचा मुलगा आणि शीनाचा धाकटा भाऊ आहे. इंद्राणी शीना आणि मिखाईलसाठी गुवाहाटीला पैसे पाठवायची. ११व्या वर्गापर्यंत शीना आपल्या आजी-आजोबांकडे राहून शिकली, नंतर ती शिकायला बाहेर गेली. त्यानंतर नोकरीसाठी मुंबईत आली. २०१२ साली शीना गुवाहाटीला आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेली आणि तिथून परतल्यानंतर बेपत्ता झाली. इंद्राणीनं सर्वांना सांगितलं होतं की, शीना अमेरिकेत नोकरीसाठी गेलीय. एवढंच नव्हे तर इंद्राणीनं शीनाचे अमेरिकेतील काही फोटो पण दाखवले होते. मिखाईलनं मीडियाशी बोलतांना सांगितलं की, शीना तिच्यात आणि इंद्राणीमध्ये झालेल्या काही गोष्टींबद्दल सांगायची, पण त्या आताच सार्वजनिक करणार नाही. इंद्राणी पोलिसांसमोर काय सांगते, त्यानंतर मी सांगेन, असं मिखाईल म्हणतो.

6/8

सिद्धार्थ दास: 

सिद्धार्थ इंद्राणीचा पहिला नवरा आहे. तो त्रिपुरामध्ये चहाच्या मळ्यांचा मालक होता. सांगण्यात येतंय की, सिद्धार्थ सोबत इंद्राणीचं लग्न झालं नव्हतं. तो फक्त तिचा बॉयफ्रेंड होता आणि त्यांच्यापासूनच इंद्राणीनं एक मुलगी (शीना) आणि मुलगा (मिखाईल) चा जन्म झाला. या मुलांना इंद्राणीनं गुवाहाटीला आपल्या आई-वडिलांकडे सोडलं होतं. ९०च्या दशकात इंद्राणी कोलकाताला आली. तेव्हा शीना-मिखाईल आपल्या आजी-आजोबांकडे होते.

सिद्धार्थ दास:  सिद्धार्थ इंद्राणीचा पहिला नवरा आहे. तो त्रिपुरामध्ये चहाच्या मळ्यांचा मालक होता. सांगण्यात येतंय की, सिद्धार्थ सोबत इंद्राणीचं लग्न झालं नव्हतं. तो फक्त तिचा बॉयफ्रेंड होता आणि त्यांच्यापासूनच इंद्राणीनं एक मुलगी (शीना) आणि मुलगा (मिखाईल) चा जन्म झाला. या मुलांना इंद्राणीनं गुवाहाटीला आपल्या आई-वडिलांकडे सोडलं होतं. ९०च्या दशकात इंद्राणी कोलकाताला आली. तेव्हा शीना-मिखाईल आपल्या आजी-आजोबांकडे होते.

7/8

इंद्राणी मुखर्जी:

आयएनएक्स मीडियाची सीईओ राहिलेली इंद्राणी मुखर्जी या मर्डर मिस्ट्रीमध्ये प्रमुख आरोपी आहे. इंद्राणीनंही शीनाच्या हत्येची कबुली दिल्याचं कळतंय. इंद्राणीनं ३ लग्न केलेत. तिचा पहिला नवरा सिद्धार्थ दासपासून इंद्राणीला दोन मुलं झाले ते शीना आणि मिखाईल. दुसरा नवा संजीव खन्ना त्याच्यापासून एक मुलगी विधी. तीसरा नवरा पीटर मुखर्जीपासून एक मुलगा असल्याचंही सांगितलं जातंय. पहिल्या नवऱ्यापासून जन्मलेल्या मुलीच्या शीनाच्या हत्येच्या आरोपात इंद्राणीला अटक झालीय. २००८मध्ये वॉल स्ट्रीट जनरलनं इंद्राणीला जगातील ५० महिला उद्योगपतींमध्ये ४१व्या स्थानावर ठेवलं होतं.

इंद्राणी मुखर्जी: आयएनएक्स मीडियाची सीईओ राहिलेली इंद्राणी मुखर्जी या मर्डर मिस्ट्रीमध्ये प्रमुख आरोपी आहे. इंद्राणीनंही शीनाच्या हत्येची कबुली दिल्याचं कळतंय. इंद्राणीनं ३ लग्न केलेत. तिचा पहिला नवरा सिद्धार्थ दासपासून इंद्राणीला दोन मुलं झाले ते शीना आणि मिखाईल. दुसरा नवा संजीव खन्ना त्याच्यापासून एक मुलगी विधी. तीसरा नवरा पीटर मुखर्जीपासून एक मुलगा असल्याचंही सांगितलं जातंय. पहिल्या नवऱ्यापासून जन्मलेल्या मुलीच्या शीनाच्या हत्येच्या आरोपात इंद्राणीला अटक झालीय. २००८मध्ये वॉल स्ट्रीट जनरलनं इंद्राणीला जगातील ५० महिला उद्योगपतींमध्ये ४१व्या स्थानावर ठेवलं होतं.

8/8

मुंबईत हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याप्रकरणाबद्दल ऐकून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झालंय. इंद्राणी मुखर्जीच्या अटकेनंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. 

शीना बोरा:

गुवाहाटीची राहणारी शीना बोरा मुंबईमध्ये रिलायंस ग्रुपमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती. शीनाचा भाऊ मिखाइलनुसार २०१२मध्ये ती आपल्या मित्राच्या लग्नासाठी गुवाहाटीला आली होती. फेब्रुवारी २०१२ला नंतर ती बेपत्ता झाली. हे प्रकरण अनुत्तरीतच राहिलं असतं जर पोलिसांना एका खबऱ्यानं हत्येबद्दल माहिती दिली नसती. पोलिसांना माहिती मिळाली की रायगडच्या जंगलात शीनाचा मृतदेह फेकण्यात आलाय. रायगड पोलिसांनी तपास करून तिथं अज्ञात महिलेचा मृतेदह आढळल्याचं सांगितलं.

मुंबईत हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याप्रकरणाबद्दल ऐकून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झालंय. इंद्राणी मुखर्जीच्या अटकेनंतर अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत.  शीना बोरा: गुवाहाटीची राहणारी शीना बोरा मुंबईमध्ये रिलायंस ग्रुपमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती. शीनाचा भाऊ मिखाइलनुसार २०१२मध्ये ती आपल्या मित्राच्या लग्नासाठी गुवाहाटीला आली होती. फेब्रुवारी २०१२ला नंतर ती बेपत्ता झाली. हे प्रकरण अनुत्तरीतच राहिलं असतं जर पोलिसांना एका खबऱ्यानं हत्येबद्दल माहिती दिली नसती. पोलिसांना माहिती मिळाली की रायगडच्या जंगलात शीनाचा मृतदेह फेकण्यात आलाय. रायगड पोलिसांनी तपास करून तिथं अज्ञात महिलेचा मृतेदह आढळल्याचं सांगितलं.