1/5
वर्ल्ड कपला फिक्सिंगचा विळखा? कॅमरुनच्या सात प्लेअर्सने फिक्सिंग केल्याचा सणसणाची आरोप झाल्याने वर्ल्ड कपमध्ये एकच खळबळ माजलीय. विशेष म्हणजे मॅच फिक्सिर विल्सन पेरुमलने एका जर्मन वृत्तपत्राला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये हा आरोप केला असून आता कॅमरुनच्या प्लेअर्सची चौकशी करण्यात येईल अस कॅमरुन फुटबॉल संघटनेने जाहीर केलंय.
2/5
नवा चॅम्पियन हॅमेज रॉड्रीगेज गवसला कोलंबियाचा हॅमेज रॉड्रीगेज हा नवा चॅम्पियन या वर्ल्ड कपचा फाईंड ठरलाय. आत्तापर्यंत त्याने सर्वाधिक 5 गोल केले असून गोल्ड बूटच्या शर्यतीत दिग्गजांना मागे टाकत तो सध्या टॉपला आहे. 2002नंतर चारही मॅचमध्ये गोल झळकावणारा तो पहिला फुटबॉलर ठरलाय. चारही मॅचमध्ये गोल करत आता रॉड्रीगेज हा रोनाल्डो आणि रिवाल्डो या ब्राझिलियन सुपरस्टार्सच्या पंक्तित जाऊन बसलाय.
3/5
नव्या चॅम्पियन्सचा उदय चिलीसारख्या टीमने सर्वात प्रथम गतविजेत्या स्पेनला 2-0 ने पराभूत करत त्यांच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणत फुटबॉल विश्वात एकच खळबळ माजवून दिली. यानंतर याच चिलीने नॉक आऊटमध्ये बलाढ्य ब्राझिललाही विजयासाठी झुंजवल. कोस्टा रिका सारख्या टीमने तर उरुग्वे, इटली या माजी वर्ल्ड चॅम्पियनला पराभवाची धुळ चारली. तर इंग्लंडलाही बरोबरीत रोखण्याची किमया केली. कोलंबियासारख्या टीमनेही माजी वर्ल्ड चॅम्पियन उरुग्वेला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारत सा-यांनाच आश्चर्यचकित केल.
4/5
लुईस सुआरेझ वादग्रस्त चेहरा उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेझ यंदाच्या वर्ल्ड कपमधील वादग्रस्त चेहरा ठरला. त्याने लीग राऊंडमधील मॅचमध्ये इटलीच्या प्लेअरचा चावा घेतला आणि फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी त्याच्यावर फिफाने 9 मॅचेस आणि चार महिन्यांची बंदी लादली...आणि नॉक आऊटमधील मॅचला त्याला मुकाव लागल्याने त्याचा फटका उरुग्वे टीमला बसला.
5/5