वाईट सवयी... तुमच्या फायद्याच्याच!

Sep 30, 2015, 17:16 PM IST
1/8

तुमचा स्वभाव चंचल असेल आणि दिवसभर तुमची चुळबूळ थांबत नसेल तर तुम्ही दिवसभरात चांगल्या पद्धतीनं कॅलरीज कमी करू शकतात. 

2/8

जास्त चॉकलेट खाणं तुमच्या दातांसाठी चांगलं नाही हे तुम्हीही ऐकलं असेल... पण, चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेवनॉईनड केमिकल असतात... जे तुम्हाला कॅन्सरपासून हृदयरोगापासून वाचवण्यासाठी मदत करतात. 

3/8

तुमच्या घाणेरडं आणि अस्थाव्यस्थ राहण्याच्या सवयीमुळे इतरांना नक्कीच त्रास होतो. पण, एका अभ्यासानुसार अस्थाव्यस्थ आणि घाणेरडेपणानं राहणारे लोक स्वच्छ राहणाऱ्या लोकांच्या मानानं कोणतंही काम 36 टक्के जास्त चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. 

4/8

च्युईंगम खाण्याची सवय घाणेरडी नाही... काही लोक या सवयीला व्यर्थ मानतात. पण, एका शोधानुसार, च्युईंगम चावल्यानं तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होतेच शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढतो. खेळादरम्यान खेळाडूंना तुम्ही अनेकदा च्युईंगम चावताना पाहिलं असेल.

5/8

तुम्हाला जर नेहमी तक्रार करण्याची सवय असेल तर वाईट वाटून घेऊ नका... कारण, टेक्सास युनिव्हर्सिटीचे मनोवैज्ञानिक जेम्स पेन्नेवेकर यांनी केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक आपल्या तक्रारी मनातच ठेऊन कुढत राहतात त्यांच्यापेक्षा तक्रारी उघडपणे व्यक्त करणाऱ्या लोकांची प्रकृती उत्तम राहते.

6/8

जर तुम्हाला कॉफी पिण्याची सवय आहे तर ही सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कॉफीमध्ये असणारे अॅन्टीऑक्सीडेंट अल्जायमर, टाईप 2 डायबिटीज, लिव्हर कॅन्सरसाख्या आजारांपासून वाचवतात तसंच यामुळे तुमची स्मरणशक्तीही वाढते आणि हृदयलाही फायदा होतो. 

7/8

नखं चावण्याची किंवा कुरतडण्याची तुम्हाला सवय असेल तर ही सवयदेखील तुमच्या फायद्याचीच आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही स्वत:ची नखं चावताना तुमच्या तोंडात जे किटाणू प्रवेश करतात ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही क्वचितच आजारी पडतात.

8/8

तुमच्या काही वाईट समजल्या जाणाऱ्या सवयीही कधी कधी तुमच्या फायद्याच्या ठरतात... खरं वाटत नाही... तर पाहा... 