मुंबई : अनेक पुरुषांना वाटतं की महिलांचे मन ओळखणे फार कठीण जाते. महिलांना समजून घेणे अशक्य असते. मात्र वास्तवात असे काही नसते. महिलांना समजून घेणे सोपे असते. जाणून घ्या रिलेशनशिपमध्ये असताना महिलांना पुरुषांकडून या गोष्टी हव्या असतात सन्मान - पहिली गोष्ट म्हणजे महिलांना सन्मान हवा असतो. तुम्ही त्यांना सन्मान दिल्यास त्यांना ते आवडते. महिलांची प्रत्येक गोष्ट ऐकायली पाहिजे असे काही नसते. मात्र त्यांनाही प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे मत विचारायला हवे. रिलेशनशिपमध्ये असल्यास दोघांनी एकमेकांना तितकास सन्मान देणे गरजेचे असते.
जजमेंटल होऊ नका - तुम्ही जेवढे तिला मेकअपमध्ये पसंद करता तेवढेच तिला विनामेकअपही पसंत करा. तिला जसे आहे तसे स्वीकारा. जजमेंटल होऊ नका.
रोमान्स - आठवड्यातून एखाद्या दिवशी रोमँटिक डिनसर अथवा डेट नाईटसाठी वेळ काढा. मिठी मारणे, एकत्र रोमँटिक सिनेमा पाहणे या लहान लहान गोष्टीतून प्रेम व्यक्त करा.
अटेंशन - महिलांना रिलेशनशिपमध्ये अटेंशन हवे असते. तसेच तुमचे प्रेमही. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत त्यांच्या मागे मागे असले पाहिजे. मात्र दिवसातून एक ते दोन वेळा पार्टनरला जरुर कॉल करा. तसेच तुम्ही तिला मिस करताय हेही आवर्जून सांगा.
घराच्या कामात मदत - घरातील कामाची संपूर्ण जबाबदारी महिलांवर असते. अशातच तिचा पार्टनर तिला कामात मदत करत असेल तर तिच्यासाठी ही सुखावह बाब असते.
थोडेसे लाड - बेडवर असताना ब्रेकफास्ट आणून देणे, सुट्टीच्या दिवशी सकाळी स्वत: तिला चहा अथवा कॉफी करुन देणे, छोटेसे गिफ्ट देणे. भले महिला म्हणत असतील त्यांना हे आवडत नाही मात्र खरंतर त्यांना हे सगळं आवडतं असतं.