पायाची बोटं सांगतात तुमचा स्वभाव

कोणाचा स्वभाव कसा आहे? हे आपण पटकण ओळखू शकत नाही. कुणाच्याच मनाचा ठाव आपल्याला घेता येत नाही. जर कुणी म्हणालं की, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तुम्ही चटकण ओळखू शकता

Updated: Jun 10, 2022, 10:42 AM IST
पायाची बोटं सांगतात तुमचा स्वभाव  title=

कोणाचा स्वभाव कसा आहे? हे आपण पटकण ओळखू शकत नाही. कुणाच्याच मनाचा ठाव आपल्याला घेता येत नाही. जर कुणी म्हणालं की, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तुम्ही चटकण ओळखू शकता तर... यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण आपले अंग आपला स्वभाव सांगत असतात असा दावा नेहमी केला जातो. 

एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवाची ठेवण कशी आहे. त्याच्या आकारावरुन त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो. विशेष म्हणजे पायाच्या बोटांच्या आकारावरुन व्यक्तीचे वर्तन कसे असेल हे देखील सांगितले जाते. तसा अंदाज बांधला जातो. तो नेमका कसा ते पाहुयात. प्रत्येकाच्या पायाचा आकार हा वेगळा असतो. त्या पायाचा आकार आणि व्यक्तीचा स्वभाव याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करु
 

अशी व्यक्तींना नेहमी इतरांवर वर्चस्व गाजवण्याची सवय असते. 

ज्या व्यक्तींचे पायाच्या अंगठ्यापासून ते करंगळी पर्यंतचा आकार हा तिरफ्या दिशेने उतरता असतो अश्या व्यक्तींचा स्वभाव इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा असतो असं म्हणतात. अश्या व्यक्तींना नेहमी वाटत असतं की इतरांनी आम्हाला आदर द्यावा. प्रत्येकाने आमचं ऐकलं पाहिजे. जर कुणी अशा व्यक्तींचे ऐकले नाही तर त्यांना प्रचंड राग येतो.

अशी व्यक्ती प्रचंड कष्टाळू आणि परिश्रम करणारी असते.

ज्या व्यक्तींच्या पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारील बोट समांतर असतात अशी व्यक्ती खूप कष्टाळू असते . परिश्रम करणारी असते. ही व्यक्ती नेहमी आपल्या परिश्रमाच्या जोरावर यश संपादित करत असते. ही व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या नेहमी उत्तम प्रकारे पार पाडू शकतात. केलेल्या परिश्रमाच्या जोरावर अशा व्यक्तींना नेहमीच समाजात आदर आणि सन्मान मिळत असतो 

अशी व्यक्ती अद्भूत रित्या कामगिरी बजावते. 

ज्या व्यक्तींच्या पायाचे अंगठ्या शेजारील बोट इतर बोटांपेक्षा लांब असते. इतर बोटं उतरत्या क्रमाने असतात. अशी व्यक्ती आपली कामगिरी नेहमी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडत असतात. त्यांना समाजात, कुटुंबात, मित्र परिवारात नेहमीच मान सन्मान मिळत असतो. त्यांची काम करण्याची पद्धत भिन्न असते. 

अशी व्यक्ती शांतता प्रिय असते.

ज्या व्यक्तीच्या पायाचा अंगठा लांब असतो . इतर बोटं अंगठ्यापेक्षा तुलनेने लहान आणि समान लांबीची असतात अशी व्यक्ती शांतता प्रिय असते. अशा व्यक्तींची काम करण्याची पद्धत शांततेत आणि हाळू पद्धतीने करण्याची सवय असते. जास्त मोठा आवाज ऐकणं अशी व्यक्ती पसंद करत नाहीत.

अशी व्यक्ती नेहमी उत्साही असते. 

 ज्या व्यक्तीचे पायाच्या अंगठ्या शेजारील बोट लांब असतं आणि इतर बोटं कमी लांबीची असतात अशी व्यक्ती नेहमी उत्साही असते. या व्यक्तींकडे दिलेली प्रत्येक कामं ही व्यक्ती जोमाने आणि उर्जेने पूर्ण करत असतात. हे व्यक्ती नेहमी जीवनाचा आनंद घेत असता