5 वर्षांपूर्वी घेतली रिटायरमेंट तरी आजही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत नाव, किती आहे युवराज सिंहची एकूण संपत्ती?

Yuvraj Singh Networth : भारताचा माजी ऑल राउंडर युवराज सिंह आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज सिंहचं नाव हे जगातील सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर्समध्ये घेतलं जातं. जून 2019 मध्ये युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्याचं नाव हे जगातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत आहे. तेव्हा युवराजची एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. 

| Dec 12, 2024, 12:43 PM IST
1/7

भारताच्या वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिलेला युवराज सिंह याने क्रिकेट विश्वात आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले. युवराज हा त्याचा बिनधास्त अंदाज आणि सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध आहे. युवराज सिंहचा जन्म हा 12 डिसेंबर 1981 मध्ये चंडीगढ येथे झाला होता. त्याचे वडील योगराज सिंह हे देखील माजी क्रिकेटर आहेत. 

2/7

2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारल्याने युवराज प्रकाश झोतात आला होता. तसेच युवराजच्या नावावर टी20 मध्ये 12 बॉलवर अर्धशतक लागवण्याचा रेकॉर्ड देखील आहे. युवराज हा आयपीएल आणि अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सुद्धा भाग राहिलेला आहे. 

3/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंहची एकूण संपत्ती ही 291 कोटी इतकी आहे. वर्ष 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर देखील युवी जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट्समधून कोट्यवधीची कमाई करतो. युवराज सिंहने अनेक स्टार्टअप्समध्ये सुद्धा गुंतवणूक केल्या असून त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी ही जवळपास 50 कोटी इतकी आहे. युवराज सिंहचे मुंबईत दोन आलिशान फ्लॅट्स आहेत.   

4/7

युवराज सिंहचं आलिशान घर :

2013 मध्ये युवराजने वरळीच्या आलिशान आवासीय टॉवर ओमकार 1973 मध्ये दोन फ्लॅट्स 64 कोटींना खरेदी केले होते. यासोबतच युवराजचं गोवामध्येही एक घर असून चंडीगडमध्ये त्याचा दुमजली बंगला आहे. 

5/7

युवराज सिंहचं कार कलेक्शन :

रिपोर्ट्सनुसार युवराज सिंहकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, लॉम्बिरिगनी मरसिएलागोए बीएमडब्ल्यू एम5 ई60, बीएमडब्ल्यू X6M आणि ऑडी क्यू 5 अशा आलिशान गाड्या आहेत. 

6/7

युवराज सिंहची कारकीर्द :

युवराज सिंहने 40 टेस्ट सामन्यात 1900 धावा केल्या असून 304 वनडेमध्ये 8701 धावा केल्या आहेत. तसेच 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने एकूण 1177 धावा केल्या आहेत. युवराज सिंहने गोलंदाजी करताना टेस्टमध्ये 9, वनडेत 111 तर टी 20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत. 

7/7

युवराज सिंहचं कुटूंब :

युवराज सिंहने नोव्हेंबर 2016 मध्ये त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हेझेल कीच हिच्याशी लग्न केले. जानेवारी 2022 मध्ये त्यांनी मुलाला जन्म दिला ज्याचं नाव  ओरियन ठेवण्यात आलं. तर ऑगस्ट 2023 मध्ये जोडप्यानं मुलीला जन्म दिला जिचं नाव हे ऑरा असं ठेण्यात आलं.