यावर्षी सर्वाधिक चर्चा झालेल्या महिलांची यादी तुम्ही पाहिलीत का ? टॉप 5 मध्ये आहेत या देशाच्या...

2023 हे वर्ष अवघ्या काही दिवसात संपणार आहे. पण या वर्षी जगभरात घडलेल्या घटनांमध्ये कोणाचे नाव सर्वात जास्त आले हे तुम्हाला माहीत आहे का ? या वर्षी सर्वाधिक चर्चा झालेल्या महिला कोण याबद्दल जाणुन घेणार आहोत. 

Dec 20, 2023, 16:50 PM IST

2023 हे वर्ष अवघ्या काही दिवसात संपणार आहे. पण या वर्षी जगभरात घडलेल्या घटनांमध्ये कोणाचे नाव सर्वात जास्त आले हे तुम्हाला माहीत आहे का ? या वर्षी सर्वाधिक चर्चा झालेल्या महिला कोण याबद्दल जाणुन घेणार आहोत. 

1/5

टेलर स्विफ्ट

2023 फोर्ब्सच्या यादीत  पाचव्या क्रमांकावर असलेली टेलर स्विफ्ट खूप चर्चेत आहे.  फोर्ब्सच्या यादीत आपली गाणी आणि अभिनयाद्वारे स्थान मिळवणारी ती पहिली महिला आहे. असं म्हटलं जातं की टेलर स्विफ्टने गाणी आणि रॉयल्टीमधून 500 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत.

2/5

जॉर्जिया मेलोनी

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या वर्षी चर्चेत होत्या. फोर्ब्सच्या यादीत मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहे.  मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 1946 मध्ये इटली लोकशाही बनली आणि 2022 मध्ये इटलीला मेलोनीच्या रूपाने पहिली महिला पंतप्रधान मिळाली.

3/5

कमला हॅरिस

 कमला हॅरिस याही वर्षभरात चर्चेत राहिल्या. कमला हॅरिस या अमेरिकेतील पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. याशिवाय कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन आहेत. फोर्ब्सच्या यादीत कमला हॅरिस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4/5

  क्रिस्टीन लेगार्ड

  क्रिस्टीन लेगार्ड फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिस्टीन लेगार्ड या युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा आहेत. क्रिस्टीन लेगार्डे या युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख झालेल्या पहिल्या महिला आहेत. 

5/5

उर्सुला वॉन डेर लेयन

फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या उर्सुला वॉन डेर लेयन . या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आहेत. जुलै 2019 मध्ये उर्सुला वॉन डेर लेयन यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. उर्सुला वॉन डर लेयन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या महिला आहेत. उर्सुला वॉन डर लेन त्यांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. उर्सुला वॉन डर लेयन या सर्वात शक्तिशाली महिला मानली जाते.