Mumbai : एकीचे बळ! सरकारी अधिकाऱ्यांनी श्रमदानातून सोसायटीचं रुपडच पालटलं, सर्वात सुंदर आणि सुरक्षित वसाहत

Mumbai : या सरकारी वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. मात्र, अधिकाऱ्यांनी जादूची कांडी फिरवावी तसं या कॉलनीचं रंग रुपच बदलून टाकलं आहे. 

Apr 24, 2023, 20:10 PM IST

Bandra Government Colony : एकीचे बळ काय असतं ते सरकारी अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी श्रमदानातून सोसायटीचं रुपडच पालटलं आहे. वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील "वाय कॉलनी" या वर्ग-१ अधिकाऱ्यांच्या स्थानिक रहिवासी आणि शासकीय यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व सुरक्षित वसाहत तयार केली आहे. 

1/7

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जवळपास 800 ते 1000 झाडे लावण्यात आली व त्यासाठी ठिबक सिंचनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.

2/7

क्रिकेट नेट, टर्फ ग्राउंड,पुस्तकांची लायब्ररी,बगीचा, बटरफ्लाय गार्डन, लॉन,महीला व वृद्धांसाठी जागो जागी बसण्यासाठी बेंचेस याची व्यवस्था करण्यात आली.

3/7

 स्थानिक रहिवाशांनी वर्गणी काढून कॉलनी अंतर्गत डांबरी रस्ते,मुलांसाठी क्रीडा उपकरणे उपलब्ध करुन दिली. 

4/7

 स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी,सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी यांनी निधी उपलब्ध करून दिला. 

5/7

कुठलीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने प्रत्येक महिन्याला दोन तीन चोऱ्या नियमित होत असत. त्यामुळे सर्व रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

6/7

स्थानिक रहिवासी असलेले शासकीय अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन श्रमदानातून स्वच्छतेचा प्रारंभ केला.

7/7

 सुमारे दीड वर्षापूर्वी या वसाहतीत सर्वत्र कचरा साठून घाणीचे साम्राज्य होते. दरवर्षी पावसाळ्यात तर ४-५ फुटांपर्यंत पाणी साचायचे.