iPhone 15 सारखे फिचर असलेला 'हा' फोन भारतात लाँच; दमदार प्रोसेसर आणि पावरफुल कॅम

Xiaomi 14 Civi Launch in India : बहुचर्चिंत Xiaomi 14 Civi स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये iPhone 15 सारखे फिचर आहेत. Xiaomi 14 Civi  फोनमध्ये दमदार प्रोसेसर आणि पावरफुल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोनसह रेडिमी, रियलमी तसेच इतर आघाडीच्या स्मार्टफोनला हा फोन टक्कर देणार आहे.  जाणून  घेऊया Xiaomi 14 Civi फोनचे फिचर्स आणि किंमत.

Jun 13, 2024, 11:29 AM IST
1/7

Xiaomi 14 Civi या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य

Xiaomi 14 Civi या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये  iPhone 15 सारखा नॉच देण्यात आला आहे. 

2/7

3 कलर व्हेरियंटम

क्रूझ ब्लू, मॅचा ग्रीन आणि शॅडो ब्लॅक अशा 3 कलर व्हेरियंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा फोन वजनाला हलका आहे. याचं वजन फक्त 177 ग्रॅम इतकं आहे. 

3/7

किंमत

8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर, 12GB + 512GB  व्हेरिएंटची किंमत 47,999 रुपये इतकी आहे. 

4/7

कॅमेरा

या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. यात Leica लेन्ससह आहे.  दुसरा कॅमेरा 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. 50-मेगापिक्सेल 2X टेलिफोटो कॅमेरा आहे. 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅनेरा 78 डिग्री व्ह्यू अँगलसह येतो. 

5/7

बॅटरी बॅकअप

या फोनमध्ये 4,700mAh चा दमदार बॅटरीबॅकअप देण्यात आला आहे. यात 67W फास्ट चार्जर आहे. 30 मिनिटांत हा फोन 80 टक्के चार्ज होता असा कंपनीचा दावा आहे.

6/7

चिपसेट

 या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट वापरण्यात आला आहे. या फोनमध्ये  Android 14 आधारित Xiaomi HyperOS  देण्यात आला आहे. 

7/7

AMOLED डिस्प्ले

या फोनमध्ये 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 1.5K रिझोल्युशनचा हा डिस्प्ले आहे. यात 120Hz इतका रिफ्रेशरेट मिळतो.