WPL2024 शेवटी करून दाखवलं! आरसीबीच्या विजयात एलिसची मोलाची कामगिरी

महिला प्रिमियर लीगचा फायनल सामना जिंकत आरसीबीने स्वत:चा नवा इतिहास रचला. आयपीएल आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचं स्वप्नं अखेर महिला संघाने पूर्ण केलं. संघाची कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

Mar 18, 2024, 13:24 PM IST
1/7

सोळा वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर आरसीबीने फायनलमध्ये विजय मिळवत ट्रॉफी खेचून आणली. स्मृती मानधनाने संघाचं नेतृत्व यशस्वीरित्या पार पाडलं असलं तरी, ही फायनल जिंकण्यात एलिस पॅरीचा सिंहाचा वाटा आहे.

2/7

अरुण जेटली स्टेडीयमवर दिल्ली कॅपिटल्स् विरुद्धच्या फायनलमध्ये आरसीबीचं प्रतिनिधीत्व करत एलिस पॅरी दमदार कामगिरी बजावली. महिला प्रिमियर लीगच्या 9 सामन्यात एलिसने विरुद्ध संघाच्या 7 विकेट्स घेतल्या. 

3/7

एलिसने आरसीबीचं प्रतिनिधित्व करत संघाच्या विजयासाठी वेळप्रसंगी गोलंदाजीसोबत फलंदाजीचा धुरा यशस्वीरित्या सांभाळला. फायनलचा विजय मिळवल्यानंतर एलिसाला ऑरेंजकप देत गौरविण्यात आलं.

4/7

महिला प्रिमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा काढणारी आणि यशस्वी फलंदाजीकरता तिचा गौरव करण्यात आला. प्रिमियर लीगच्या 9 सामन्यात एलिसाने 347 धावांची विक्रमी खेळी रचली.   

5/7

दिल्लीच्या स्टेडियमवर रंगलेला अंतिम सामना आरसीबीच्या आठ वर्षांच्या  इतिहासातील ऐतिहासिक सामना ठरला. या मालिकेत एलिसाने अर्धशतक केलं आहे. 

6/7

त्याचबरोबर श्रेयंका पाटिलने WPL 2024 च्या सामन्यात विरुद्ध संघाच्या 13 विकेट्स घेतल्या. या सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेत श्रेयंका पाटिलने  दमदार कामगिरी बजावली.   

7/7

आरसीबीचा हा ऐतिहासिक विजयानिमित्त चाहत्यांकडून या महिला खेळाडूंचे कौतुक होत आहे.