सर्वात उंच झोपडपट्टी, येथे भिकारीही 22 व्या मजल्यावर राहतात!

Worlds Tallest Slum: ती जगातील तिसरी सर्वात उंच गगनचुंबी इमारत असणार होती. पण 1994 मध्ये बँकांवर आर्थिक संकट कोसळले. आर्थिक अस्थिरता जाणवू लागली. याच कारणामुळे या इमारतीचे काम पूर्ण करता आले नाही आणि ही इमारत सरकारच्या ताब्यात गेली. 

| Sep 19, 2023, 17:51 PM IST

slum tower of David: या इमारतीचे खरे नाव “Centro Financiero Confinanzas” आहे. या इमारतीचे बांधकाम डेव्हिड ब्रिलेमबर्ग नावाच्या बिल्डरने 1990 मध्ये सुरू केले होते. त्यानंतर ती कराकसमधील सर्वात उंच इमारत बनणार होती. अशी एक इमारत जिथे जगभरातील सर्व मोठ्या कंपन्यांची कार्यालये होती. पण 1994 मध्ये असे काही घडले, ज्यामुळे या इमारतीचे नशीबच बदलले.

1/9

जगातील सर्वात उंच झोपडपट्टी; ना वीज, ना पाणी तरीही राहतात हजारो लोक

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

worlds tallest slum: मुंबईतील धारावीची झोपडपट्टी जगातील मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये गणली जाते. येथे खूप मोठ्या परिसरात हजारो कुटुंब दाटीवाटीने राहतात. पण तुम्हाला मलिक वस्तीबद्दल माहिती आहे का?

2/9

45 मजली इमारत

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

ही झोपडपट्टी 45 मजली इमारतीत आहे. जगातील सर्वात उंच झोपडपट्टी व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये आहे. या गगनचुंबी इमारतीत एक-दोन नव्हे तर 30 हजारांहून अधिक लोक राहतात. ही इमारत ‘टॉवर ऑफ डेव्हिड’ म्हणून ओळखली जाते आणि ती कराकसच्या सर्वात प्रमुख क्षेत्राच्या मध्यभागी आहे.

3/9

1990 मध्ये बांधकाम

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

या इमारतीचे खरे नाव “Centro Financiero Confinanzas” आहे. या इमारतीचे बांधकाम डेव्हिड ब्रिलेमबर्ग नावाच्या बिल्डरने 1990 मध्ये सुरू केले होते. त्यानंतर ती कराकसमधील सर्वात उंच इमारत बनणार होती. 

4/9

1994 मध्ये घटना

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

अशी एक इमारत जिथे जगभरातील सर्व मोठ्या कंपन्यांची कार्यालये होती. पण 1994 मध्ये असे काही घडले, ज्यामुळे या इमारतीचे नशीबच बदलले.

5/9

इमारत सरकारच्या ताब्यात

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

ती जगातील तिसरी सर्वात उंच गगनचुंबी इमारत असणार होती. पण 1994 मध्ये बँकांवर आर्थिक संकट कोसळले. आर्थिक अस्थिरता जाणवू लागली. याच कारणामुळे या इमारतीचे काम पूर्ण करता आले नाही आणि ही इमारत सरकारच्या ताब्यात गेली. 

6/9

बांधकामे बंद

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

तेव्हापासून आजतागायत बांधकामे बंद आहेत. या इमारतीत ना लिफ्ट आहे ना वीज किंवा पाण्याचे कनेक्शन आणि बाल्कनीदेखील नाही. बहुतेक मजल्यांवर खिडक्याही बंद असून अनेक ठिकाणी भिंतीही नाहीत.

7/9

लोक 22 व्या मजल्यापर्यंत राहतात

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

सन 2007 पर्यंत या इमारतीत अनेक लोक राहू लागले. बेकायदेशीर राहण्याबरोबरच ड्रग्ज आणि इतर गुन्हेही तेथे घडू लागले. हे प्रकरण चर्चेत आले. मात्र, असे असूनही कामगार वर्गाचे लोक तेथे येऊन स्थायिक होत राहिले. सध्या या इमारतीत 22 व्या मजल्यापर्यंत लोक राहत आहेत. 

8/9

आतमध्ये अनेक दुकाने

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

विशेष म्हणजे आता या इमारतीच्या आत कपड्यांची दुकाने, ब्युटी पार्लर, डेंटिस्ट आणि इतर महत्त्वाची दुकानेही सुरू झाली आहेत. या इमारतीत राहणाऱ्या काही लोकांनी गाड्याही घेतल्या आहेत. त्या पार्किंगमध्ये ठेवल्या आहेत. या इमारतीत सुमारे 700 कुटुंबीय राहतात.

9/9

स्वतःचा सहकारी संघही

worlds tallest slum tower of david 45th Flower Building

शहरातील इतर झोपडपट्ट्यांपेक्षा हे ठिकाण चांगले आहे. तसेच ते अधिक सुरक्षित आहे, असे येथे राहणाऱ्यांचे म्हणणे आहे. या इमारतीत राहणाऱ्या लोकांनीही एक सहकारी संघ तयार केला असून, त्यामाध्यमातून लोकांच्या सुविधांची काळजी घेतली जाते. कॉरिडॉरच्या रंगरंगोटीपासून ते 24 तास सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले असून ते रात्रभर गस्त घालत असतात.