जगातील सर्वात मोठी सोसायटी, आयुष्यभर बिल्डिंगबाहेर जावं लागणार नाही इतक्या सुविधा; येथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंब

World Largest Residential Building: तुम्ही आतापर्यंत अनेक रहिवासी इमारती पाहिल्या असतील, पण जगातील सर्वात मोठी रहिवासी इमारत कुठे आहे तुम्हाला माहितीये का? येथे 100-200 नव्हे तर तब्बल 20 हजार लोक राहतात.   

| Oct 07, 2024, 20:52 PM IST

World Largest Residential Building: तुम्ही आतापर्यंत अनेक रहिवासी इमारती पाहिल्या असतील, पण जगातील सर्वात मोठी रहिवासी इमारत कुठे आहे तुम्हाला माहितीये का? येथे 100-200 नव्हे तर तब्बल 20 हजार लोक राहतात. 

 

1/7

जगातील सर्वात मोठी रहिवासी इमारत चीनमध्ये आहे. चीनच्या कियानजियांग सेंच्युरी सिटीमध्ये ही इमारत आहे. या बिल्डिंगचं नाव रिजेंट इंटरनॅशनल आहे.   

2/7

S आकाराची ही 675 फूट उंच इमारत वास्तुकलेचं आश्चर्य आहे. हे खऱंतर हॉटेल म्हणून बांधण्यात आलं होतं, ज्याचं रुपांतर नंतर रहिवासी इमारतीत झालं.   

3/7

S-आकाराची रिजेंट इंटरनॅशनल 1.47 दशलक्ष स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेलं आहे. या 39 मजली टॉवर्सच्या अपार्टमेंटमध्ये 20,000 हून अधिक रहिवासी राहतात.  

4/7

विशेष म्हणजे आधीच इमारतीत 20 हजार नागरिक  वास्तव्यास असताना त्याची क्षमता संपलेली नाही. अजून 10 हजार लोक येथे वास्तव्य करु शकतात इतकी जागा आहे.   

5/7

या इमारतीत दैनंदिन गरजा पूर्ण होतील अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे रहिवाशांना इमारत सोडून जाण्याची गरजच नाही.   

6/7

या इमारतीत शॉपिंग सेंटर्स, रेस्तराँ, शाळा, हॉस्पिटल, स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, फू़ड कोर्ट, भाज्यांची दुकानं, सलून, गार्डन असं सर्वकाही आहे. यामुळे येथे राहणाऱ्या 'सेल्फ कंटेंड कम्युनिटी' म्हटलं जातं.   

7/7

चिनी वृत्तसंस्था सिनाने दिलेल्या माहितीनुसार, जगातील या सर्वात मोठ्या निवासी इमारतीतील खिडकीविरहित खोलीचे भाडे 1,500 युआन (सुमारे 17,000 रुपये) ते एका मोठ्या अपार्टमेंटपर्यंत 4,000 युआन (सुमारे 48,000 रुपये) आहे. या इमारतीत विद्यार्थ्यांसह नवोदित व्यावसायिक राहतात.