World Laughter Day 2024 Wishes : खळखळून हसायला लावणारे मराठीतून भन्नाट जोक्स, 'जागतिक हास्य दिना'च्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Jokes : 'हसा आणि हसवा' हा जगाचा मूलमंत्र राहिला तर तुमचं जीवन अधिक सुखकर होईल. हसायला एक दिवस कशाला? असा प्रश्न विचारला जात असला तरीही जगभरात 5 मे हा 'जागतिक हास्य दिवस' म्हणून साजरा केला जातो. 

| May 05, 2024, 07:38 AM IST

World Laughter Day 2024 : 'जागतिक हास्य दिन' दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो, जो आज 5 मे रोजी साजरा केला जात आहे. अशा वेळी या दिवशी एकट्याने नव्हे तर मित्रांसोबत हसावे. चेहऱ्यावरचे हास्य माणसाला उत्साही बनवते. प्रत्येक कामात हसून आयुष्य तर चांगलेच दिसते, पण अनेक आजारही आपोआप नाहीसे होतात.

हसण्याने पोट आणि फुफ्फुसांचा देखील व्यायाम होतो, असे म्हणतात. या जागतिक हास्य दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही संदेश कोट्स घेऊन आलो आहोत, ज्या शेअर करून तुम्ही 'जागतिक हास्य दिना'च्या शुभेच्छा देऊ शकता.

1/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

नुसती बोलून गार करणारी माणसं  असतील तर पाठवा हीकड लई उकडालय हिकडं 

2/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

चिंटू - पप्पा तुमच्या डा…  पप्पा - चूप… किती वेळा तुला सांगितलं, जेवताना मध्ये बोलू नकोस म्हणून.  मग जेवण झाल्यानंतर…  पप्पा - आता सांग चिंटू काय बोलत होतास?  चिंटू- पप्पा, तुमच्या डाळीत माशी पडली होती.

3/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता.  पप्पू - काय बघतोयस रे इतकं?  चिंटू - ही गळती नेमकी कुठून होतेय ते बघतोय.

4/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते… वकील : एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला? नवरा : मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर… तर ती म्हणाली तुम्हीच करा… तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे…

5/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

बायको - मी ना आज तुमच्यासाठी स्पेशल डिश तयार केलीय...  नवरा - काय केलसं नेमकं...? बायको - असा पदार्थ केलाय ती खाल्ल्यावर उकाडा होईल गायब  नवरा - असं काय केलं आहेस...? बायको - भज्या तळल्यात नवरत्न तेला... थंडा थंडा कूल कूल 

6/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

दोन मित्र एकमेकांशी गप्पा मारत असतात… पिंट्या : यार बंड्या, एक गोष्ट विचारू? बंड्या : विचार ना भाई पिंट्या : यार बंड्या, सुख म्हणजे नक्की काय असतं? बंड्या : कोणाला माहीत यार, माझं तर लहानपणीच लग्न झालं होतं… बंड्याचं उत्तर ऐकून पिंट्या अक्षरश: गडाबडा लोळायला लागला…

7/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

रजनीकांत – हॅलो, मी रजनीकांत बोलतोय मुलगा – हो, मला माहिती आहे... बोला? रजनीकांत – तुला कसं कळलं बे मी कॉल केला म्हणून? मुलगा – अहो, मोबाइल स्विच ऑफ होता माझा!

8/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

डॉक्टरांना कळत नव्हतं की पेशंटला कसं सांगावं की तू सीरियस आहे... शेवटी नर्सनेच सांगितलं... मोबाइलमधलं काही डिलिट करायचं असेल तर करून टाका. पेशंट काय समजायचं ते समजून गेला!

9/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

माझी लोकप्रियता बघून मैत्रिणींनी मला एकदा विचारलं… तू निवडणूक का लढत नाहीस? मी म्हणाले, एकदा मी एकाला निवडलं होतं… त्याच्याशी लढायलाच आता मला वेळ मिळत नाही… मैत्रिणींनी पुन्हा कधीच मला हा प्रश्न विचारला नाही!

10/10

झक्कास मराठी जोक

World Laughter Day

किचन टिप्स. भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात. त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात. आपलं मत काय?